Breaking News
Home / जरा हटके / आई कुठे काय करते मालिकेतील या अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन

आई कुठे काय करते मालिकेतील या अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन

आई कुठे काय करते या मालिकेमधील सर्वच पात्रे त्यांच्या दमदार अभिनयाने घराघरात पोहचली आहेत. आई कुठे काय करते मालिका सुरवातीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात असलेली पाहायला मिळते. अशात रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असलेल्या या मालिकेतील एका अभिनेत्रीच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील रजनी कारखानीस म्हणजेच गौरीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकरच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे.

actress sushma murudkar family
actress sushma murudkar family

मागच्या आठवड्यात म्हणजेच रविवार २ जानेवारी २०२२ रोजी अभिनेत्री सुषमा मुरुडकरच्या वडिलांचे म्हणजेच जयवंत मुरुडकर यांची प्राणज्योत मालवली. सुषमाने तिच्या शोषाल मीडिया अकाऊंटवर या विषयीची पोस्ट शेअर करत ही माहिती सर्वांना कळवली आहे. यावेळी अभिनेत्रीने बाबांच्या ७ व्या आणि १० व्या दिवस कार्याबद्दल माहिती दिली आहे. तसेच कॅपशनमध्ये तिने, “पापा लव यू ” असे लिहित पाणावलेल्या डोळ्यांचे ईमोजी शेअर केले आहेत. कोणाही मुलीच्या आयुष्यात वडील अग्रस्थानी असतात आई पेक्षा मुलीचा जीव वडिलांवरच असलेला नेहमी पाहायला मिळतो. तसेच आपल्या वडिलांचा एका कार्यक्रमातील एक व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे. यामध्ये तिचे वडील ‘अरे दिवानो मुझे पेहचानो’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी शेअर करत तिने वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक कलाकार मंडळींनी देखील तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिलेली पाहायला मिळतेय.

actress sushma father jayvant murudkar
actress sushma father jayvant murudkar

सुषमा मुरुडकरच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी बोलायचं झाल्यास तिने करिअरच्या सुरुवातीला काही प्रोडक्शन हाऊसमध्ये ग्राफिक डिझाईनरचे काम केले. त्यानंतर २०१७ साली तिने अभिनयाला सुरुवात केली. हिंदीतील छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये ती पहिल्यांदा झळकली. त्यानंतर ‘संजीवनी’ आणि ‘कसोटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकांमध्ये देखील तिने अभिनय केला. अशात मराठी सिनेसृष्टीतील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. या मालिकेत तिची एन्ट्री ही अनिरुद्धला धडा शिकवण्यासाठी होती. कारण मालिकेत ती अनिरुद्धच्या कंपनीची सीईओ दाखवण्यात आली आहे. अशात ती आल्यानंतर अनिरुद्धची नोकरी जाते आणि नंतर संजनाच्या कामांमध्ये देखील अडथळे येतात. सुषमाने या मालिकेतील रजनी या पात्राला पूर्ण पने न्याय दिला आहे. सध्या तिच्या वडिलांच्या निधनामुळे मालिकेतील सर्वच कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *