आई कुठे काय करते या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री रुपाली भोसले मालिकेसह तिच्या सोशल मीडियावरील हटके पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. अशात संजना नावाने घराघरात पोहचलेल्या या अभिनेत्रीचा एक फोटो सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच झालं असं रुपलीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवस साजरा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. आता हे बडे सेलिब्रेशन तिच्याच वाढदिवसाचं आहे बरं. तिने हे फोटो २८ डिसेंबरला पोस्ट केले. त्यामुळे रुपालीच्या वाढविसवरून एकच चर्चा सुरू झाली.

कारण अभिनेत्री रुपाली भोसले हिची जन्म तारीख २९ डिसेंबर हीच आहे. आता तुम्हीही विचारात पडले असाल की अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिचा आधीच वाढदिवस कसा काय साजरा केला. तर जास्त विचारात पडू नका कारण याच उत्तर रुपालीने स्वतःच फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये दिलं आहे. तिने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “माझा वाढदिवस २९ डिसेंबरला आहे. पण माझे कुटुंबीय माझा वाढदिवस दर वर्षी १ डिसेंबर रोजी साजरा करतात.” सुरवातीपासूनच इचे घरचे तिचा वाढदिवस दरवर्षी १ डिसेंबरला रोजीच साजरा करत आले आहेत. याचमुळे रुपाली भोसले हीच वाढदिवस १ तारखेलाच साजरा केला जातो. या कारणामुळे वर्षातून २ वेळेला तिला वाढदिवस साजरा करायला मिळतो असं ती म्हणते. पण ह्यामुळे तिच्या चाहत्यांना तिची खरी जन्मतारीख काय आहे हे समजू शकत नाही त्यावर उलगडा म्हणून आज तिने आपला फोटो शेअर करत चाहत्यांना हि माहिती दिली आहे. अनेकांनी त्या फोटोवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो.

रुपाली भोसलेने आज तिच्या दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. मालिकेत सध्या ती नोकरीच्या आनंदात आहे. अशात अभीच्या लग्नातील तयारी सुरू असताना एक खेळ पार पडला. त्यावेळी संजना आणि अरुंधती आमनेसामने आल्या होत्या. यावेळी त्यांना समोरच्याची नजर चुकवून रींगणातला रुमाल उचलायचा होता. यावेळी सर्वांच्या पसंती प्रमानेच अरुंधती जिंकली. संजना या मालिकेत जरी खलनायीकेची भूमिका साकारत असली तरी देखील तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तिने आजवर मोठा संघर्ष करत यशाचं शिखर गाठलं आहे. आपल्या संघर्षाविषयी ती अनेक मुलाखतींमध्ये बोलताना दिसली आहे. आता उद्या तिचा वाढदिवस असल्याने आज पासूनच सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.