आई कुठे काय करते ही मालिका अरुंधती आणि अनिरुद्धच्या घटस्फोटानंतर एका वेगळ्या ट्रॅकवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे अरुंधती आता अनिरुद्धच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःसाठी जगताना दिसणार आहे. सध्या अरुंधती आपल्या आईच्या घरी राहत असली तरी घटस्फोट झाल्याने शेजारपाजारचे लोक तिला आता टोमणे मारताना दिसत आहेत. तिच्या प्रवासात हे अडथळे येणार हे ती जाणून असल्याने येणाऱ्या संकटांना ती एकटीने सामोरी जाताना दिसणार आहे. आई कुठे काय करते ही मालिका एका बंगाली मालिकेचा रिमेक आहे.

आता अरुंधतीच्या आयुष्यात काय काय नव्या घडामोडी घडणार हे पाहणे आता रंजक होणार आहे. तुर्तास मालिकेत अरुंधतीच्या आईची भूमिका मेधा जांबोटकर यांनी साकारली आहे त्यांच्या कुटुंबाबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी आज जाणून घेऊयात…अभिनेत्री मेधा जांबोटकर या हिंदी मालिका अभिनेत्री आहेत. मराठी सृष्टीतील दिवंगत अभिनेत्री ‘मनोरमा वागळे’ या त्यांच्या आई तर त्यांचे वडील मनोहर वागळे हे नाट्य आणि संगीत समीक्षक म्हणून ओळखले जात. मराठी चित्रपट अभिनेत्री मनोरमा वागळे यांनी गंमत जंमत, आम्ही दोघे राजा राणी, सगळीकडे बोंबाबोंब सारख्या चित्रपटातून कधी खाष्ट सासू तर कधी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. मनोरमा वागळे आणि मनोहर वागळे यांनी तीन मुली. मेधा जांबोटकर ही त्यांची मुलगी आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आली. मेधा जांबोटकर यांनी ‘ये रिश्ते है प्यार के’ या हिंदी मालिकेत काम केले होते. सध्या मेधा जांबोटकर ‘आई कुठे काय करते’ आणि ‘ये रीश्ता क्या केहलाता है’ या दोन मालिका साकारत आहेत.

‘ये रीश्ता क्या केहलाता है’ मालिकेत त्या भाभीमाँची भूमिका साकारत असल्याने दोन्ही मालिकेसाठी काम करत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन्ही मालिका एकाच प्रॉडक्शनच्या असल्याने मालिकेची मला सांभाळून घेते असे त्या मीडियाशी बोलताना म्हणाल्या. मेधा जांबोटकर या १९८३ साली जयंत जांबोटकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. ‘नकुल आणि मानसी ‘ ही त्यांच्या मुलांची नावं आहेत. नकुलचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव आहे ‘नेहा धवन जांबोटकर’. तर त्यांची मुलगी मानसीचे देखील लग्न झाले आहे. मानसी , आज्जी मनोरमा वागळे आणि आई मेधा जांबोटकर या तिघींच्या चेहऱ्यात बरेचसे साम्य आढळते. दिवंगत अभिनेत्री मनोरमा वागळे यांच्या या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा…