छोट्या पडद्यावर एकमेकींचा दुस्वास करणाऱ्या आणि संसारात बिब्बा कालवणाऱ्या अभिनेत्री ऑफस्क्रीन नेहमीच चांगल्या मैत्रिणी असतात याचे किस्से आपण नेहमीच ऐकतो वाचतो .मालिकेत एकमेकींच्या विरोधक असल्या असलो तरी पडद्यामागे आमची खूप धमालमस्ती सुरु असते अशा प्रतिक्रिया नेहमीच व्यक्त केल्या जातात. यामध्ये आता भर पडली आहे ती आई कुठे काय करते या मालिकेतील संजना म्हणजे रूपाली भोसले आणि अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले यांच्या मैत्रीची. खरेकर पडद्यावर या दोघी एकमेकींच्या सवती आहेत पण सीन संपल्यानंतर या दोघींच्याही सेटवर धमाल गप्पा रंगलेल्या असतात. नुकताच सवत माझी लाडकी असं म्हणत संजना प्रेम रुपालीने अरुंधती फेम मधुराणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि दोघींचे एकत्रित वेगवेगळ्या मुड मधील फोटो देखील सोशल मीडियावर रुपालीने शेअर केले आहे.

रूपाली आणि अरुंधती च्या या ऑफ स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन नात्याची चर्चा या पोस्ट मुळे चांगलीच व्हायरल झाली आहे. विवाहबाह्य संबंध या वन लाईन स्टोरी वर आजपर्यंत अनेक मालिका छोट्या पडद्यावर पाहायला मिळाल्या . नेहमी चीच स्टोरी असला तरी घरासाठी झटणार्या अरुंधतीला जेव्हा तिचा नवराअनिरुद्ध आयुष्यातून बाजूला करतो आणि जुनी मैत्रीण संजना हिच्यासोबत संसार थाटतो तेव्हा ही मालिका पाहणाऱ्या अनेक गृहिणींनी अरुंधतीसाठी आसवं ढाळलेली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका लोकप्रियतेच्या आलेखात नेहमीच वरचढ ठरलेली आहे. खलनायिकेचे पात्र वठवणाऱ्या संजना म्हणजेच रुपाली भोसले हिने प्रेक्षकांचे शिव्याशाप घेण्यात बाजी मारली आहे ती तिच्या अभिनयाने . आई कुठे काय करते या मालिकेबाबत बोलायचं झालं तर संजयनामुळे अरुंधती चे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि याचा परिणाम देशमुख यांच्या हसत्या खेळ त्या कुटुंबावर झाला. अरुंधती घर सोडून गेली आणि संजना चा देशमुखांच्या घरात सून म्हणून प्रवेश झाला . सध्या आई कुठे काय करते ही मालिका या वळणावर येऊन ठेपली आहे. अनेक धक्कादायक ट्वीस्ट मुळे ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे .पडद्यावर संजना आणि अरुंधती एकमेकींच्या नेहमीच विरोधात असलेल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना रुपाली भोसले हिच्या इन्स्टा पेजवरील एका पोस्ट ने धक्का दिला. मधुराणीचा वाढदिवस साजरा केला आणि या वाढदिवसानिमित्त रुपाली भोसले हिने मधुराणीला शुभेच्छा दिल्या.

सोबत एकमेकींचे वेगवेगळ्या कार्यक्रमातील फोटो शेअर करत मधुराणीच्या वाढदिवसाचा आनंदही साजरा केला. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की मधुराणी तू खूप मेहनती आहेस .अरुंधती ची भूमिका सादर करत असताना या भूमिकेला असलेल्या वेगवेगळ्या छटा उत्तमरित्या मांडल्या आहेस . मी जरी ऑनस्क्रीन तुला त्रास देत असले तरी तो माझ्या कामाचा भाग आहे . या मालिकेमुळे मला छान मैत्रीण मिळाली आणि आपली मैत्री मी अशीच जपेन. वाढदिवसा सारख्या तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी तुला खूप साऱ्या शुभेच्छा . तुझी अभिनयाची कारकीर्द कायम बहरत राहो आणि आपली मैत्री अशीच फुलत राहो. रुपाली भोसले आणि मधुराणी गोखले यांचा एकत्रित काम करण्याचा हा पहिला प्रोजेक्टआहे. यापूर्वी रुपालीने काही हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे .रूपाली बिग बॉस दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती .मधुराणी गोखले देखील मालिका आणि सिनेमांमध्ये यापूर्वी दिसली आहे. मधुराणी गोखले एक संवेदनशील कवयित्री देखील आहे. ती अभिनय प्रशिक्षण केंद्रही चालवते .