आई कुठे काय करते मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली मालिकेचा टीआरपी त्यामुळे चांगलाच वाढला पण आता मालिकेला वाढवण्यासाठी मालिकेत नवनवे कटकारस्थाने दाखवली जातायेत त्यामुळे मालिका पाहणाऱ्या चाहत्यांची चांगलीच निराशा झालेली आहे. आई अरुंधती घरातील लोकांना एकजुटीने राहायला शिकवते त्यांच्या अडीअडचणीत त्यांना होईल तेवढी मदत करते तर इकडे संजना घरातील लोकांना एकमेकांपासून दूर करण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळते. आई कुठे काय करते या मालिकेतील एक व्यक्ती नुकताच मालिकेतून काही वेळ ब्रेक घेतलेला पाहायला मिळतोय..

“आई कुठे काय करते” मालिकेतील अरुंधतीचा मुलगा यश साकारणारा अभिनेता “अभिषेक देशमुख” याने मालिकेतून काही दिवस ब्रेक घेतला आहे. आपल्या फॅमिलीसोबत तो लंडनच्या टूरला गेला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा म्हणून अभिषेक देशमुख हा लंडनला आपल्या फॅमिलीसोबत फिरायला गेला आहे. त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेच्या पुढच्या काही भागात तो पाहायला मिळणार नाही. पण तिकडून तो पुन्हा भारतात आल्यावर तो आपल्याला मालिकेत नक्कीच पाहायला मिळणार आहे. नुकतंच त्याने आपल्या सोशिअल मीडियावर लंडनला मज्जा मस्ती करत असल्याचं सांगितलं आहे. अभिषेक देशमुख याची पत्नी कृतिका देव हि देखील त्याच्यासोबत लंडनला असल्याचं समजत. झी युवा वरील पॅकअप ह्या नव्या प्रोजेक्टमध्ये ती अभिनेता प्रथमेश परब सोबत पाहायला मिळणार आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री कामातून वेळ काढून आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मालिकेतून ब्रेक घेतात आणि पुन्हा जोमाने काम करताना पाहायला मिळतात.