आई कुठे काय करते मालिकेत कांचन देशमुख हे पात्र साकारले आहे अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी. सुरुवातीला आपला मुलगा अनिरुद्ध च्या बाजूने असलेल्या कांचनबाई आता अरुंधतीच्या बाजूने असलेल्या पाहायला मिळतात. आपल्या मुलाने संजनाशी लग्न करू नये असे मत त्यांनी बनवले असल्याने सध्या हे पात्र प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…नाटक, चित्रपट मालिकेतून विविधांगी भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती.

सिधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हमरमळा हे त्यांचे सासर. महेंद्र पाटकर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. आत्मविश्वास, सून लाडकी सासरची, इना मीना डिका यासारखे चित्रपट त्यांनी गाजवले. तर “आभास हा” सारख्या मालिकांमधून त्यांनी कधी विरोधी तर कधी सहकलाकाराची भूमिका बजावली. सुरुवातीला सह अभिनेत्री म्हणून भूमिका गाजवून त्यांनी सून लाडकी सासरची चित्रपटात सासूची भूमिका गाजवली. अर्चना पाटकर यांची सून मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. अर्चना पाटकर यांचा मुलगा आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली भूमिका बजावत आहे. यातुन तो हिंदी मालिकेसाठी काम करताना दिसतो. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचा दांडगा अनुभव ही त्याला आहे. अभिनेत्री हेमलता बाणे सोबत तो विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेत्री “हेमलता बाणे” ही एके काळची आघाडीची नायिका अर्चना पाटकर यांची सून आहे. लहानपणापासून नृत्याची विशेष आवड असल्याने इयत्ता सातवीत असतानाच ‘मस्ताना’ हा स्टेज शो केला.

इथूनच पुढे ४०० हुन अधिक अल्बम मधून काम केले त्यातील “रेतीवाला नवरा पाहिजे” या अल्बमला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. आम्ही सातपुते, इवलासा खोपा,नवरा माझा भवरा, चल धर पकड, कॅरी ऑन देशपांडे, मोहर, सत्य सावित्री आणि सत्यवान, लावू का लाथ, चिरगुट, साहेब यासारख्या चित्रपटातून तिने प्रमुख भूमिका बजावल्या. मानाचा मुजरा, झुंज मराठमोळी यासारख्या शोमध्येही तिने सहभाग दर्शवून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यामुळे या काळात तिने एक आघाडीची नायिका म्हणून आपले नाव मराठी सृष्टीत कोरले होते. हेमलता आता अभिनय क्षेत्रात फारशी दिसत नसली तरी निर्मिती क्षेत्रात तिने पाऊल टाकले आहे. आदित्य पाटकर आणि हेमलता बने पाटकर याना आयुष्याचा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..