आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या पतीने दुसरे लग्न केल्यानंतर अरुंधती देखील घटस्फोट घेऊन आपल्या घरातून बाहेर पडली आहे. त्यावेळी ती आपल्या घरी जाते तेंव्हा मालिकेत तिच्या भावाची एन्ट्री होते. आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या भावाची भूमिका साकारली आहे अभिनेते “केदार शिरसेकर” यांनी. केदार शिरसेकर हे मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका अभिनेते म्हणून ओळखले जातात.’आई कुठे काय करते’, ‘एक होती राजकन्या’,’प्रेम पॉइजन आणि पंगा’,’आम्ही सातपुते’,’स्वराज्यजननी जिजामाता’,’बाळू मामाच्या नावानं चांगभलं” अशा विविध लोकप्रिय मालिकेतून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेता केदार शिरसेकर हा प्रसिद्ध अभिनेते “शशिकांत शिरसेकर” यांचा मुलगा आहे. अभिनेते शशिकांत शिरसेकर हे नाट्य, चित्रपट आणि मालिका अभिनेते म्हणून ओळखले जायचे. ‘सासरचं धोतर’,’ कमाल माझ्या बायकोची’,’नवरा बायको’,’वहिनीची माया’, ‘मुलगा माझा बाजीराव’ अशा चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी अभिनय साकारला होता. ऑक्टोबर २०१९ साली अभिनेते शशिकांत शिरसेकर यांचे निधन झाले. मराठी सिनेसृष्टीत अश्या दांडग्या अभिनेत्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. अभिनेता केदार शिरसेकर लहान होते त्यावेळी वडिलांबरोबर ते नाटकाच्या तालमीला जात असत तेव्हा एका नाटकात काम करण्याची त्यांना संधी मिळाली होती. वयाच्या ८ व्या वर्षी ‘शाकुंतल’ हे पहिलं नाटक त्यांनी साकारलं होतं. शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी नाटकात काम करण्याचे थांबवले. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर एकांकिका, नाट्यस्पर्धा असा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. ‘दांडेकरांचा सल्ला’, लोच्या झाला रे’,’ यदा कदाचित’,’सही रे सही’ अशा कित्येक गाजलेल्या नाटकातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.

या नाटकाचे हजारो प्रयोग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सध्या आई कुठे काय करते मालिकेत आता संजना आणि अनिरुद्धच्या लग्नाची लगीनघाई चालली आहे. तर अरुंधतीने आपलं घर सोडून आपल्या आई आई भावाकडे गेलेली पाहायला मिळतेय. आई कुठे काय करते या मालिकेत केदार शिरसेकर हा अरुंधतीचा भाऊ सुधीरची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेमुळे केदार शिरसेकर हे नाव आता प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे. अरुंधतीला साथ देणारा तिचा भाऊ सुधीर केदार शिरसेकर यांनी चांगलाच निभावला आहे. बहिणीची काळजी घेणारा हा सुधीर आता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. या भूमिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी केदार शिरसेकर याना खूप खूप शुभेच्छा…