शूटिंग करत असताना अनेक कलाकारांना वेगवेगळ्या अपघातांना सामोरे जावं लागतं पण शो मस्ट गो ऑन म्हणत स्वतःच्या वेदना विसरून त्यांना शुटींग थांबवताही येत नाही. असाच प्रकार झालाय आई कुठे काय करते या मालिकेतील लोकप्रिय खलनायिका म्हणजेच संजना च्या भूमिकेत असलेली रुपाली भोसले हिच्या बाबतीत.सध्या आई कुठे काय करते ही मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे आणि अशाच एका रंजक सीनचे शूट करत असताना रुपाली भोसले तिच्या पायाला दुखापत झाली. काही कळायच्या आतच तिच्या पायाच्या नखातून रक्त वाहायला सुरुवात झाली पण पुढच्या दहाच मिनिटात पायाला ड्रेसिंग करून रुपालीने अर्धवट राहिलेला सीन पूर्ण केला. सोशल मीडियावर ॲक्टिव असलेल्या रुपाली भोसले हिने इन्स्टा पेजच्या स्टोरी मध्ये हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

मालिकेत जरी रुपाली खलनायिका असली तरी तिचे लाखो चाहते सोशल मीडियावर आहेत आणि त्या सगळ्यांनी तिला गेट वेल सून अशी कमेंट केली आहे. कुटुंबासाठी झटणाऱ्या एका स्त्रीचा नवरा बाहेरख्यालीपणा करतो आणि त्याच्या विरोधात ती स्त्री उभी राहते. सक्षमपणे एकटीने जगायला सुरुवात करते. तिच्यातील कलागुणांना वाव देते आणि कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारचा अन्याय सहन करू नका असा संदेशही देते. या कथेवर बेतलेली आई कुठे काय करते ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा मला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली आहे. खरे तर या मालिकेची नायिका अरुंधती ही आहे. अरुंधती च्या आयुष्या भोवती सगळी मालिका फिरते. परंतु अरुंधतीच्या नवर्याच्या आयुष्यात आलेली संजना नावाची महिला हीदेखील या मालिकेचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील संजनाची भूमिका करणाऱ्या रुपाली भोसलेने तिच्या अभिनयातून या मालिकेला अगदी पुरेपूर न्याय दिला आहे. रुपाली भोसले ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते . वेगवेगळ्या लुकमध्ये व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत संजना हे पात्र ट्रेंडमध्ये आहे. संजनाला सध्या अटक झाली आहे आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास अनिरुद्धने नकार दिलाय. त्यामुळे या मालिकेत सध्या नाट्यमय घटना सुरू आहेत. असाच एक सीन शूट करत असताना रुपालीला सेटवर अपघात झाला. अनिरुद्ध तिच्यावर ओरडत आहे आणि त्यामुळे रूपाली रडत रडत खुर्चीवर बसते असा सीन शूट करण्यात येत होता. परंतु सीन अधिक नाट्यमय व्हावा यासाठी खुर्चीवर बसण्या ऐवजी अनिरुद्ध ओरडताच रुपालीने जमिनीवर बसावं असं सुचवण्यात आलं.

आणि हाच सीन करताना रूपाली जमिनीवर बसण्याचा शॉट देत असतानाच तिच्या पायावर दाब पडला. पायाचं बोट चेपलं गेलं आणि नखाला दुखापत झाली काही. क्षणातच तिच्या पायाच्या नखातून रक्त वाहू लागलं. याबाबत रुपालीने इन्स्टा स्टोरी शेअर करत असे म्हटले आहे की ,नेमकं मी माझ्या पायाच्या बोटांना लाल रंगाचे नेलपेंट लावलं होतं. त्यामुळे मला सुरुवातीला रक्त आलं नसेल तर ते नेलपेंट असेल असंच वाटलं. पण नंतर मात्र मला पायाच्या पोटातून कळ यायला लागली. ही घटना घडली त्या दिवशी रविवार असल्यामुळे सेटच्या आजूबाजूला डॉक्टर उपलब्ध झाले नाही त्यामुळे सेटवरच प्राथमिक उपचार केले. शूटिंग सुरू असल्याने ते बंद करता येणे शक्य नव्हतं. त्यामुळे पायाला बँडेज करून पुढचा सीन दिला . कलाकार म्हणून अनेकदा कितीही अपघात झाले. वेदना झाल्या तरी शूटिंग बंद केल्याने होणारे नुकसान टाळणं शक्य नसतं. असंच काहीसं मला अपघात घडला त्या दिवशीही झालं पण आता माझी तब्येत बरी आहे असेही रुपालीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.