Categories
actors

मराठी चित्रपटसृष्टीत सत्तर ऐंशीचे दशक गाजवणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्याला मदतीची गरज

मराठी चित्रपटसृष्टीत सत्तर-ऐंशीचे दशक गाजवणाऱ्या चरित्र अभिनेत्यात “विलास रकटे” हे नाव आघाडीचे होते. हुकमी अभिनय आणि जरबयुक्त आवाज या शिदोरीवर रकटे रसिकांच्या पसंतीस उतरले होते. चित्रपट निर्मिती, राजकारण, सामाजिक कार्य अशा नानाविध कार्यात रमलेल्या विलास रकटे यांचा ‘चित्रकर्मी’ पुरस्काराने सन्मान देखील करण्यात आला. सामना, सुळावरची पोळी, प्रतिकार, तांबव्याचा विष्णूबाळा, अंगारकी, निखारे अशा दमदार चित्रपटातून त्यांनी विविध ढंगी भूमिका गाजवल्या आहेत. प्रतिकार चित्रपटातली त्यांनी साकारलेली रणजितची भूमिका फारच लक्षवेधी ठरली होती . अभिनयात सरस ठरलेल्या या कलाकाराने मधल्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक नेते, कार्यकर्ते घडवले. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी सतत पाठपुरावा केला.

vilas rakte actor
vilas rakte actor

आज इतक्या वर्षांनी ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून गुडघ्याच्या त्रासाने ते त्रस्त आहेत. त्यांच्या मदतीला प्रशांत साळुंखे सर धावून आले असून एक पोस्ट शेअर करून मदतीचे आवाहन करत त्यांनी ही माहिती दिली आहे. हीच खरी आमच्यासाठी शिवजयंती! असे म्हणत प्रशांत साळुंखे यांनी ही माहिती दिली आहे त्यात त्यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात…एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत सुवर्णकाळ गाजवला, मात्र उत्तर वयात गुडघ्याच्या शस्त्रक्रीयेसाठी पैसा नाही…ही हालाखीची परिस्थिती आहे ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे यांची. अनेक ऐतिहासिक भुमिका बजावत त्यांनी इतिहासाला उजाळा दिला. अशा या महान कलाकारास मदतीचा हात देऊन पुन्हा जोमाने पायावर उभा करतो आहे… त्यांच्या उपचाराची जबाबदारी शिवराष्ट्र हायकर्स, मदत फाउंडेशनने घेतली आहे. काल त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून उपचारासाठी 1 लाख 25 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण खर्च मार्गी लावून या उमद्या कलाकारास पुन्हा उभारी देऊ !! याचसोबत त्यांनी मदतीसाठी आवाहन देखील केले आहे जेणेकरून ह्या उमद्या कलाकाराला पुन्हा त्याच्या पायावर उभे राहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *