Categories
actress

शनाया साकारणारी अभिनेत्री रसिक सुनील पडली या व्यक्तीच्या प्रेमात

माझ्या नवऱ्याची बायको मालिका फेम शनया अर्थात रसिका सुनील मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिकेतील कुणाल सोबत ती लग्न करणार असून परदेशात जाणार असल्याचे दाखवून तिचे शनयाचे पात्र कायमची एक्झिट घेणार आहे. रसिका मालिकेत दिसणार नाही म्हटल्यावर तिचे चाहते जरासे नाराज होणार हे निश्चितच परंतु लवकरच ती काहीतरी खास गोष्टी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. नव्या वर्षाची सुरुवातही तीने अशाच हटके अंदाजात केलेली लहायला मिळत आहे. नुकतेच रसिकाने नव्या वर्षाचे स्वागत करत एका खास व्यक्ती सोबतचा फोटो शेअर केला आहे. रसिका नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लॉस एंजेलीस येथे गेली असून या खास व्यक्तीसोबत ती डेट करत असल्याची चर्चा आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर मराठी कलाक्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

actress rasika sunil
actress rasika sunil

रसिका ज्या व्यक्तीला डेट करत आहे त्या व्यक्तीचे नाव आहे “आदित्य बिलागी”. आदित्य हा एक उत्तम डान्सर असून कोरीओग्राफर, मार्शल आर्टस्, ड्रॉईंग याचीही त्याला विशेष आवड आहे. यासोबतच सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही तो कार्यरत आहे. बॉलिवूड, हिपऑप अशा डान्सफॉर्ममधील त्याने केलेले नृत्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. २०१७ सालापासून लॉस एंजेलीसच्या #bfunk डान्स क्लासमध्ये तो सहभागी झाला गेल्या वर्षी #bfunk मधील त्याने सादर केलेल्या नृत्याला देशभरातून नावाजले गेले या एका व्हिडिओमुळे आदित्य खूपच लोकप्रिय झाला त्या एकाच व्हिडिओमुळे त्याची दखल जगभरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी घेतलेली पाहायला मिळाली होती. आदित्य आणि रसिका हे दोघेही लॉस एंजेलीसलाच भेटले तिथेच त्यांची खास मैत्रीही झाली. आता हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा कलाक्षेत्रात रंगल्या आहेत. आदित्यच्या प्रेमात पडण्याअगोदर रसिका मराठी चित्रपट, मालिका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ह्याला डेट करत होती. परंतु काही वर्षातच त्यांचे ब्रेकअप देखील झाले त्यानंतर सिध्दार्थने २०१९ साली मिताली मयेकर सोबत साखरपुडा केला आणि आता लवकरच ते लग्नही करत आहेत. सिद्धार्थ बरोबरच्या ब्रेकअप नंतर रसिकाने मालिका, चित्रपट, म्युजिक व्हिडीओ क्षेत्रात आपला जम बसवला. मधल्या काळात ती शिक्षणासाठी परदेशातही गेली होती या प्रवासातच तिला तिचा आयुष्याचा जोडीदार मिळाला असे म्हणायला हरकत नाही. आता रसिका आणि आदित्य लग्न कधी करणार याकडे साऱ्या चाहत्यांचे लक्ष लागून राहणार हे मात्र नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *