१२००० कोटींच्या मालकाला स्वतःच्या मुलाने रस्त्यावर आणलं पण आता पुढे जे झालय ते पाहून तुम्हाला धक्का बसेल

काही महिन्यांपासून रेमंड कंपनीच्या कपड्याना भारतातच नव्हे तर परदेशातून देखील मोठी मागणी येत आहे. याचा चांगला परिणाम म्हणजे गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून रेमंड कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल ३५ ते ४० टक्के इतकी वाढ झाली आहे. रेमंड या ब्रँडची कपडे अनेक व्यक्ती मोठ्या दिमाखात वापरतात. या ब्रँडची प्रसिद्धी देखील मोठी आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? या ब्रँडचा मालक आणि त्याच्या वडिलांमध्ये मोठे वाद सुरू आहेत. या संबंधी आता पर्यंत तुम्ही अनेक वृत्त पाहिले असतील. अशात एवढ्या मोठ्या ब्रँडचे मालक असूनही बाप आणि मुलगा यांच्यातील नातेसंबंध एवढे दूषित का झाले आहेत या विषयी सोप्या भाषेत थोडी माहिती जाणून घेऊ….गौतम विजयपत सिंघानिया हा या ब्रँडचा मालक आहे. त्याच्या आधी याची मालकी त्याच्या वडिलांकडे म्हणजे विजयपत सिंघानिया यांच्याकडे होती.

तब्बल १२ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक असूनही त्यांना त्यांच्या मुलामुळे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली असं विजयपत यांचं म्हणणं आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, “माझ्या मुलाने मला फसवून माझी संपत्ती, गाडी आणि घर हडपले आहे. त्यामुळे आज मी एका भाड्याच्या घरात राहतो आणि माझ्या दारी दारिद्र्य पसरलं आहे. ” आता हे कसं काय झालं याची सुरुवात नेकमी कशी झाली हे माहीत करुन घेऊ. तर विजयपत यांनी साल २०१५ साली त्यांच्या मुलाला कंपनीचे सगळे शेअर दिले होते. त्यावेळी त्या शेअरची किंमत हजारो कोटी रुपये एवढी होती. घर, कंपनी सर्वकाही मुलाच्या नवे केली स्वतःकडे काहीच ठेवलं नाही. पण त्याच्या मुलाने काही काळानंतर त्यांची सर्व संपत्ती बळकावली आणि बापाला रस्त्यावर आणलं हे सर्वांनाच माहित असेल. पण आता मुलानेच वडिलांन विरोधात तक्रार दाखल केली आहे त्याच झालं असं विजयपत यांनी त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘विजयपत सिंघानिया एन इनकंप्लीट लाइफ’ नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यांना हे पुस्तक प्रकाशित करायचं होतं. मात्र गौतमने या पुस्तकात माझ्या विषयी अपमानास्पद लिहिले आहे असे म्हणत न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे या प्रकरणी न्यायामूर्ति एसपी तावडे यांच्या खंडपठासमोर ही याचिका सुरू होती.

अशात न्यायालयाने या पुस्तकाच्या विक्रीवर आणि प्रकशनावर बंदी घातली. मध्यंतरी गुप्त पद्धतीने या पुस्काची विक्री केली गेल्याचा आरोप देखील विजयपत सिंघानिया यांच्यावर करण्यात आला होता. मात्र त्यामुळे पुन्हा एकदा न्यायलायकडून या पुस्तकात बंदी घातली गेली. मोठ्या संपत्तीचे मालक आणि प्रसिध्दी मिळवूनही आज हे दोघे बाप लेक एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. रेमंड ब्रँड तर चांगला सुरू आहे. अजूनही त्याची प्रसिध्दी कायम आहे. त्यामुळे अर्थातच या कंपनीचा मालकी हक्क असलेला गौतम ऐशोआरमात आयुष्य जगत असणार. मात्र एके काळी १२ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले त्याचे वडील म्हणजेच विजपत हे मात्र दारिद्र्याच्या छायेत जगत आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होणार तसेच आणखीन याला कोणते वळण मिळणार याकडेच आता अनेकांचे लक्ष वेधले आहे.