ह्या मराठी अभिनेत्रीने सांगितलं “जेव्हा जेव्हा ऑडिशनला जायचे तेव्हा तेव्हा लोकं माझ्याकडे पाहून……”

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतीकाची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “अक्षया नाईक” हिने. अक्षयाने बालकलाकार म्हणून अकल्पित या मराठी चित्रपटातून काम केले होते त्यानंतर ये रीश्ता क्या केहलाता है, ये रिष्ते है प्यार के सारख्या हिंदी मालिकांमधून सहनायिकेच्या भूमिका साकारल्या. मनवा नाईक हिने प्रथमच तिला सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून प्रमुख नायिकेची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यात तिने साकारलेल्या लतीकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या यशा पर्यतचा तिचा हा प्रवास मात्र खूपच खडतर होता… अनेक संघर्षाशी दोन हात करत असताना त्यातून निर्माण होणार ताण सहन करावा लागायचा. या प्रवासाबद्दल बोलताना तिने खूप काही सांगितले आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात….
अक्षया नाईक याबाबत बोलताना म्हणते… जेव्हा जेव्हा मी ऑडिशनला जायची तेव्हा तेव्हा लोकं माझ्याकडे पाहून… “यार, काय ह्या जाड पोरी उगाच ऑडिशनसाठी येत असतात?” अस माझ्या कानावर आलं… ही बाब माझ्यासाठी अजिबात नवी नव्हती कारण कित्येकदा मी स्टुडिओजमध्ये जायचे आणि तिथे माझ्याकडे बघून “इथं लिडसाठी ऑडिशन चालू आहे…नॉट फिट..रिजेक्टेड..आम्हाला हिरोईन पाहिजे” असं अनेक लोकं म्हणायची. त्यावेळी खूप राग यायचा, चिडचिड व्हायची, प्रसंगी रडूही यायचं पण मी कधीच हार मानली नाही. या गोष्टींमुळे मला खूप स्ट्रेस जाणवू लागला परंतु हा सर्व ताण बाजूला सारून आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवू लागले. अक्षयाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती त्यात ती म्हणाली होती की लोक मला नेहमी म्हणतात “तू जाड आहेस, पण खूप सुंदर दिसतेस” जाड लोकांना नेहमीच ट्रोल केलं जातं आम्ही जाड आहोत हे आम्ही स्वीकारलं आहे. तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमच्या शरीरावरुन तुम्हाला जास्त ओळखलं जातं या गोष्टीचं खूप वाईट वाटतं…