
झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. नुकतेच या मालिकेत अभिनेत्री नेहा खान हिची एन्ट्री झाली आहे. नेहा खान या मालिकेतून राउडी एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारणार आहे. एवढे दिवस होऊनही पोलिसांना या गावात घडलेल्या घटनांचा सुगावा न लागल्याने ही जबाबदारी आता दिव्या सिंगकडे सुपूर्त करण्यात आली आहे. त्यामुळे मालिकेत या घटनांचा तपास करत असलेले इन्स्पेक्टर इथून पुढे मालिकेत दिसणार की नाही किंवा ते दिव्याला कशा पद्धतीने मदत करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारणारा हा कलाकार नेमका कोण आहे? ते जाणून घेऊयात…

देवमाणूस मालिकेतून इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराचे नाव आहे “मल्लिकार्जुन कुसुंबे” उर्फ “अर्जुन कुसुंबे”. मल्लिकार्जुन कुसुंबे हे मूळचे पुण्याचे ११ नोव्हेंबर १९८७ साली त्यांचा जन्म झाला. सालेम हायस्कुल येथून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एस एम जोशी हायस्कुल तसेच पुणे युनिव्हर्सिटी येथून बीकॉमची पदवी मिळवली आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी मॉडेलिंगही केले आहे. यासोबतच अनेक नाटकांमध्ये सहभाग देखील दर्शवला. प्रमोद सावंत दिग्दर्शित “धाडस” या चित्रपटात त्यांना मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती. हा त्यांनी अभिनित केलेला पहिलाच चित्रपट ठरला. यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. यानंतर “तालीम” ह्या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका देखील बजावली होती. तुम्हाला आठवत असेल झी मराठीवरील “लागींर झालं जी” या लोकप्रिय मालिकेत त्यांनी ” लेफ्टनंट शैलेश शिर्के” ही भूमिका साकारली होती या भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहोचले होते. मालिकेत त्यांच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला नसला तरी त्यांच्या डॅशिंग भूमिकेला पेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. अर्जुन कुसुंबे यांचे १५ जून २०२० रोजी ईशा सोबत लग्न पार पडले.