२०१३ ते २०१६ या कालावधीत झी मराठी वाहिनीवर “होणार सून मी ह्या घरची” ही मालिका प्रसारित होत होती. मालिकेतील श्री आणि जान्हवीच्या जोडीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती . या मालिकेत “ओवी” चे पात्र दर्शवले गेले होते आपल्या निरागस अभिनयाने या चिमुरडीने साऱ्यांचीच मने जिंकून घेतली होती. ओवीची भूमिका साकारणाऱ्या ह्या चिमुरडीला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही देण्यात आला होता. आज ओवी काय करते हे अनेकांना जाणून घेण्याची ईच्छा आहे चला तर मग जाणून घेऊयात याबाबत अधिक…

होणार सून मी ह्या घरची मालिकेत ओवीचे पात्र साकारले होते “क्रीतीना वर्तक” या बालकलाकाराने. क्रीतीना एक मॉडेल असून अनेक व्यावसायिक जाहिराती तसेच एक बालकलाकार म्हणून मराठी चित्रपट, मराठी- हिंदी मालिका तीने अभिनित केल्या आहेत. शशांक केतकर सोबत झी युवा वरील इथेच टाका तंबू या आणखी एका मालिकेतून तिने काम केले होते. तर “कनिका”, “द शैडो” सारख्या भयपटात तीने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हिरवी हा आणखी एक मराठी चित्रपट तिने अभिनित केला आहे. याशिवाय स्टार प्रवाहवरील गोठ (मालिकेतील बालपणीची राधा) , डर, गर्ल्स ऑन टॉप, सावधान इंडिया, लक्ष्य, शपथ, जोधा अकबर अशा अनेक हिंदी मराठी मालिकेतून तीने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मालिकांसोबतच क्रीतीनाने बेटी बचाओ बेटी पढाओ कॅम्पेन, ताज ग्रुप, एसबीआय, विवा इलेकट्रोनिक शोरूम अशा अनेक ऍडसाठी काम केले आहे. तुम्हाला जाणून कौतुक वाटेल की क्रीतिनाने “पँटलुन ज्युनिअर फॅशन आयकॉन’ 15” स्पर्धेमध्ये पार्टीसिपेट केले होते. या स्पर्धेत ६०० स्पर्धकांमधून केवळ १०० मुलांची निवड करण्यात आली होती. या १०० मुलांमधून क्रीतीनाने पहिला क्रमांक पटकावला होता. एक बालकलाकार म्हणून क्रीतीनाला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. क्रीतीना सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील “जय जय स्वामी समर्थ” या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून ती चंदाची सावत्र बहीण म्हणून एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेनंतर साधारण ४ते ५ वर्षांनी ती या मालिकेत दिसत आहे. त्यामुळे कदाचित बहुतेकांनी तिला या मालिकेतून ओळखलेही असेन. क्रीतिका वर्तक ही बालकलाकार अभिनय क्षेत्रात अशीच यशाची उंच शिखरे गाठत राहो हीच एक सदिच्छा…