स्वराज्यजननी जिजामाता या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेतून अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने जिजामातोश्रींची व्यक्तिरेखा साकारली आहे. मालिका लीप घेत असल्या कारणाने पुढील काही दिवसांतच ही भूमिका आता ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. भार्गवी चिरमुलेने साकारलेल्या जिजामातोश्रींच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. नुकतेच भार्गवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना तसेच सह कलाकारांना भावनिक आवाहन केले आहे त्यात तिने म्हटले आहे की….” माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू……

हे आहेत श्री. चिरमुले आजोबा कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले त्यात यांचे देखील पण अनेकांनी शिकावी अशी यांची वयाच्या ८१ तही असलेली जगण्याची जिद्द आणि लढाऊ वृत्ती….हे आजोबा आपल्या 65 वर्षीय मूक-बधिर बहिणीसोबत सदाशिव पेठेतील एका वाड्यात रहातात. उदरनिर्वाहासाठी दोघेही बँकांमधून शेव, फरसाण वगैरे पदार्थ विकतात आणि रोज संध्याकाळी सदाशिव पेठेत एका स्टूलावर सर्व पदार्थ मांडून विकण्याचा प्रयत्न करतात.पण कोरोना आला आणि सोबत यांच्या आयुष्यात घेऊन आला मोठ्ठे प्रश्नचिन्ह ??? बँका चालू होत्या, चालू आहेत आजोबांची बँकेत जाऊन पदार्थ विकण्याची तयारीही आहे पण बँकेतले कर्मचारी आजोबांना आता येऊ देत नाहीत, अर्थात स्वतःच्या आणि आजोबांच्या काळजीपोटी पण आता करायचे काय ? चिरमुले आज्जी आजोबा या पदार्थांसोबत कधी उदबत्ती, कधी वाती ,कधी पंचांग विकायला आणतात. आता आजोबांनी कॅलेंडर विकायला ठेवली आहेत. आपल्या सर्वांना एक आवाहन आहे. कॅलेंडर तर आपण कोठून तरी घेणारच मग आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच एका चांगल्या कामाने झाली तर ? आपण घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा आपल्यासाठी असलेलं ‘कॅलेंडर’ कोणाच्यातरी जगण्याचा आधार बनू शकेल…संतोष सुबाळकर पत्ता- श्री. चिरमुले 1682, सदाशिव पेठ, स्वादभेळ/नेवाळे मिसळ समोर, ग्राहकपेठेची अगदी मागची बाजू खजिनाविहिर चौक” चिरमुले कुटुंबातील सदस्याने लिहिलेल्या पोस्टवर भार्गवी म्हणते की, ” हे माझे चुलत काका आणि आत्या आहेत…आम्ही कुटुंबीय सगळे काही ना काहीतरी मदत त्या दोघांना करतच असतो पण शेवटी आत्मनिर्भर स्वभाव आहे. त्यांचा. म्हणून माझ्या पुण्यातल्या मित्र मैत्रिणींना मी रिक्वेस्ट करते तुमच्या परीने जी मदत होऊ शकेल कॅलेंडर किंवा इतर वस्तू विकत घेण्याचा निमित्ताने तेवढी करा…मनापासून आभार….”