मराठी सृष्टीत सध्या लग्नसोहळ्यांना उधाण आले आहे वर्षाच्या अगदी सुरुवातीपासूनच बरेचसे कलाकार विवाहबद्ध झाले आहेत. तर काही अभिनेत्रींची लवकरच लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी अभिनेत्री नयना मुके ही देखील विवाहबद्ध झाली आहे. नयना मुके हि मराठी नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून अभिनय साकारत आहे. काल १८ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री नयना मुके हीचा विनायक भोकरे सोबत मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला असून या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक सहकलाकारांनी हजेरी लावली होती.

अभिनेत्री नयना मुके हिने “गणपती बाप्पा मोरया”, “देवयानी”, “अनवट”, “ये रे ये रे पैसे”,” फायनल डिसीजन” सारख्या चित्रपट नाटक तसेच मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नयनाला ‘फायनल डिसिजन’ या व्यावसायिक मराठी नाटकातील भूमिकेसाठी दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. नयनाला नृत्याची देखील विशेष आवड असून अनेक पारितोषिकं तिने पटकावली आहेत. सुरुवातीला मॉडेलिंग म्हणूनही ती रॅम्पवॉक करताना दिसली. गणपती बाप्पा मोरया या मालिकेत प्रथमच लक्ष्मीची भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली होती. ही आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या अभिनयाने चोख बजावली होती. तर विनायक भोकरे हा देखील मराठी सृष्टीत कार्यरत असून सुपर्ब प्लँन चित्रपटाचे म्युजिक डायरेक्टर तसेच गायक म्हणून काम केले आहे याशिवाय मालिकामधून छोट्या मोठ्या भूमिकाही त्याने साकारल्या आहेत. तू अशी जवळी रहा या मालिकेतून नयना आणि विनायक दोघांनी एकत्रित काम केले आहे. अभिनेत्री नयना मुके आणि विनायक भोकरे या नवदाम्पत्यास आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…