ही अभिनेत्री साकारणार शुभ्राची भूमिका…खऱ्या आयुष्यात मराठी सृष्टीतील या दिग्गजाची आहे नातसून

February 24, 2021
ही अभिनेत्री साकारणार शुभ्राची भूमिका…खऱ्या आयुष्यात मराठी सृष्टीतील या  दिग्गजाची आहे नातसून

झी मराठी वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. माझ्या नवऱ्याची बायको, अग्गबाई सासूबाई या दोन मालिका गेल्या कित्येक वर्षे त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या देवमाणूस आणि लाडाची मी लेक गं या मालिकाही आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या मालिकांच्या जागी घेतला वसा टाकू नको, अग्गबाई सुनबाई, रात्रीस खेळ चाले, पाहिले न मी तुला या नव्या मालिका प्रसारित होणार आहेत.

new shubhra actress
new shubhra actress

अग्गबाई सासूबाई या मालिकेचा सिकवल येत असून त्याचा पुढील भाग अर्थात अग्गबाई सुनबाई ही मालिका आता नव्याने येऊ घातलेली दिसून येते. नुकताच या मालिकेचा प्रोमो पाहायला मिळाला त्यात अभिजित राजे आणि आसावरी त्याच भूमिकेत दर्शवले आहेत तर शुभ्राच्या भूमिकेत एक नवखा चेहरा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने गाजवलेली शुभ्राची भूमिका आता अभिनेत्री “उमा ऋषिकेश” साकारणार आहे. स्वामिनी या लोकप्रिय मालिकेतून उमाने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. एसएनडीटी महाविद्यालयातून उमाने एमएची पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय कथ्थक आणि नाट्य संगीताचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. उमा ऋषिकेश हिचे पूर्ण नाव आहे “उमा ऋषिकेश पेंढारकर” प्रसिद्ध गायक, नाट्य दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर हे तिचे सासरे तर प्रसिद्ध नाट्य कलाकार, गायक भालचंद्र पेंढारकर यांची ती नातसून होय. उमाचा नवरा ऋषिकेश पेंढारकर हे आर्किटेक्ट आहेत. प्रशांत दामले यांच्या संगीत संशयकल्लोळ या नाटकात उमाने रेवतीची भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच संगीताचीही आवड असलेल्या उमासाठी हे नाटक खूपच खास ठरले होते. या भूमिकेसाठी तिला राज्यपुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. लवकरच ती अग्गबाई सुनबाई या मालिकेतून शुभ्राची भूमिका साकारणार आहे येत्या १५ मार्चपासून ही मालिका झी मराठीवर प्रसारित होत आहे उमाला शुभ्राच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…