Breaking News
Home / आरोग्य / “स्वामी समर्थ” मालिकेमुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

“स्वामी समर्थ” मालिकेमुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

कलर्स मराठी वाहिनीवर २८ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता “जय जय स्वामी समर्थ” ही मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून पाहायला मिळत आहेत. स्वामी समर्थांचा जीवनप्रवास नेमका कसा होता हे या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थांची भूमिका अक्षय मुडावदकर साकारत असून याअगोदर “गांधी हत्या आणि मी”, “द लास्ट व्हॉईसरॉय” सारखे नाटक तसेच “स्वराज्यजननी जिजामाता” मालिकांमधून त्याने काम केले आहे. तर मालिकेत “विजया बाबर” ही नवखी अभिनेत्री स्वामी समर्थांची भक्त साकारत आहे. विजया बाबर हिच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

vijaya babar actress
vijaya babar actress

विजया बाबर ही थेटर आर्टिस्ट असून “ड्रीम थेटर मुंबईशी” ती निगडित आहे. ड्रीम थेटर्सच्या अनेक नाटकांतून तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. ड्रीम थेटर्सने “सिंड्रेला”, “शिकस्त ए इश्क” अशा प्रायोगिक नाटकांची निर्मिती केली यात विजया महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. तीने अभिनित केलेल्या ‘शिकस्त ए इश्क’ या प्रायोगिक नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून २०१८ साली झी नाट्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय “जिंदगी”, “तू कहा” या म्युजिक व्हिडिओत देखील विजयाने प्रमुख भूमिका बजावली आहे. केवळ अभिनयाच नाही तर मॉडेलिंग क्षेत्र आणि विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये तिने सहभाग दर्शवला यातून २०१८ सालच्या “बेस्ट स्माईल क्वीन महाराष्ट्र” तसेच ब्लिस झेस्ट आयोजित नवी मुंबईच्या “मिस ग्लॅमरस अँड स्टायलिश” हे दोन किताबही तीने पटकावले आहेत. एखाद्या कलाकाराच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळतो तो छोट्या पडद्यावरील मालिकांमधून. विजया पहिल्यांदाच जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकत आहे त्यामुळे ती प्रकाशझोतात आलेली पाहायला मिळते. विजया बाबर हीला या पहिल्या वहिल्या मालिकनिमित्त खूप खुप शुभेच्छा… पहिल्याच भागात मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद तर मिळतोच आहे यापुढेही तो असाच मिळत राहील अशी खात्री आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *