सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर नंतर या प्रसिद्ध कलाकारांची जोडी लवकरच करणार लग्न

January 23, 2021
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर नंतर या प्रसिद्ध कलाकारांची जोडी लवकरच करणार लग्न

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या घरी लगीनघाई चाललेली पाहायला मिळत आहे. काल हळद आणि संगीताचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून आज त्यांच्या मेहेंदीचा सोहळा पार पडला आहे. येत्या रविवारी २४ जानेवारी रोजी मिताली आणि सिद्धार्थ लग्नबांधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ आणि मिताली पाठोपाठ आता आणखी एका प्रसिद्ध कलाकारांची जोडी लग्नबांधनात अडकणार आहे. त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत हे कलाकार आहे “आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील”.

aastad and swapnali
aastad and swapnali

स्वप्नाली पाटील हीने पुढचं पाऊल या मालिकेत काम केले होते. त्याचप्रमाणे कलर्स मराठीवरील “चाहूल ” ही मालिका आणि अवधूत गुप्ते दिग्दर्शित ” कान्हा ” चित्रपट तसेच “नकळत सारे घडले ” या मालिका तिने साकारल्या आहेत. “पुढचं पाऊल” या मालिकेत काम करत असताना आस्ताद आणि स्वप्नालीचे सूर जुळून आले होते. त्यानंतर बिग बॉसच्या घरात असताना आस्तादने स्वप्नालीसोबतच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र हे दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली. लवकरच स्वप्नाली आणि आस्ताद काळे विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाअगोदर त्यांच्या केळवणाचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत अभिनेत्री शिल्पा नवलकर, मेघा धाडे आणि शाल्मली तोळ्ये यांनी आस्ताद आणि स्वप्नालीचे केळवण केलेले पाहायला मिळत आहे. मध्यंतरी आस्ताद काळेने माझ्याकडे काम नसल्याचे सांगत एक पोस्ट शेअर केली होती. त्याच्या या पोस्टची दखल घेतली असून “चंद्र आहे साक्षीला” या मालिकेतून तो प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच स्वप्नाली आणि आस्ताद लग्न कधी करणार आहेत याची तारीख जाहीर केली जाईल.