Breaking News
Home / आरोग्य / सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अवनी बद्दल बरंच काही

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अवनी बद्दल बरंच काही

स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहिनीचा टीआरपी देखील वाढण्यास मदत झाली आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेसोबतच सांग तू आहेस का? या नव्याने येऊ घातलेल्या मालिकेला देखील प्रेक्षकांडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आज सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अवनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… मालिकेत अवनीची भूमिका विरोधी जरी असली तरी तिच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झालेले पाहायला मिळते. अवनीची भूमिका साकारली आहे “साक्षी गांधी ” या अभिनेत्रीने.

sakshi gandhi
sakshi gandhi

साक्षी ही मूळची चिपळूणची तिथेच तिने शालेय शिक्षण तसेच पदवीचे शिक्षण घेतले आहे. शाळेत असताना साक्षीने विविध वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला होता. सातवी इयत्तेत असताना पहिल्यांदा तिला वक्तृत्व स्पर्धेतून उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून ५१ रुपये मिळाले होते. यातून प्रेरित होऊन पुढे अनेक स्पर्धा तिने गाजवल्या याचा फायदा पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात होईल याचा विचारही तिने त्यावेळी केला नव्हता कारण अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिच्या घरच्यांकडून पुरेसा पाठिंबा तिला मिळाला नव्हता. ‘मला थेटर करायचंय’ हा विचार मनाशी पक्का ठरवून हा हट्ट तिने तिच्या घरच्यांसमोर मांडला आणि याबाबत परवानगी मिळवली. घरची परिस्थिती बेताची असूनही कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र तिला कधीच फी साठी घरच्यांकडे पैसे मागण्याची गरज पडली नाही कारण अकरावीपासून ते पदवीपर्यंत तिने अनेक स्पर्धांमधून, एकांकिकेतून बक्षिसे मिळवली यातूनच तिने आपल्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी सांभाळली होती. पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना तिने उत्कृष्ट अभिनयाची तब्बल ८ विविध पारितोषिकं पटकावली असल्याने रंगभूमीवर एक चिपळूणकर म्हणून तिचाच बोलबाला पाहायला मिळाला. या प्रसिद्धी चा फायदा पुढे चित्रपट आणि मालिकेतून तिला मिळत गेला. मन उधाण वारा, हिरकणी, अगबाई सासूबाई, अलटी पलटी, सहकुटुंब सहपरिवार अशा विविध चित्रपटातून तसेच मालिकांमधून तिला अभिनयाची संधी मिळाली परंतु सहकुटुंब सहपरिवार मालिकेतुनच तिच्या अभिनयाला खरा वाव मिळत गेला. प्रवीण तरडे यांच्यासोबत “बलोच” या आगामी चित्रपटातून साक्षी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे यासोबतच तिचे आणखी दोन चित्रपटही प्रतीक्षेत आहेत. तूर्तास अवनीच्या भूमिकेसाठी साक्षी गांधी हिला खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *