सई आणि आदित्य च्या लग्नसोहळ्यात या बालकलाकाराची होणार एन्ट्री..

February 4, 2021
सई आणि आदित्य च्या लग्नसोहळ्यात या बालकलाकाराची होणार एन्ट्री..

माझा होशील ना मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. बऱ्याच अडचणींनंतर अखेर सई आणि आदित्यचे लग्न होणार असल्याने मालिकेच्या चाहत्यांनी निःश्वास टाकला आहे. सई आणि आदित्य यांचा विवाहसोहळा देखील एका खास दिवशी दर्शवला जाणार आहे. ह्या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून आदित्य आणि सई यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येत्या १४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेन्टाईन डेचे औचित्य साधून मालिकेतील ह्या विवाह सोहळ्याचे क्षण तुम्हाला पाहता येणार आहेत.

saiaditya wedding
saiaditya wedding

मालिकेत आणखी काही खास व्यक्तींची एन्ट्री देखील होणार आहे त्यामुळे मालिका सध्या टीआरपी वाढवणारी ठरते आहे. सई आणि आदित्य च्या या विवाहसोहळ्यात एका खास बालकलाकारची एन्ट्री होत आहे हा बालकलाकार आहे तुझ्यात जीव रंगला मालिकाफेम “लाडू” अर्थात “राजवीर सिंह गायकवाड”. माझा होशील ना मालिकेत राजवीर एका पंजाबी मुलाची भूमिका साकारत आहे त्यामुळे हा आदित्यच्या कोणत्या एका मामाचाच मुलगा आहे असे तर्क लावण्यात येत आहेत . तुर्तास तो बंधू मामांचा मुलगा बनून धमाल घडवून आणेल असे संकेत मिळत आहेत. लाडू प्रमाणेच या मालिकेत आणखी एका स्त्रीपात्राची एन्ट्री होत आहे ही भूमिका अभिनेत्री दीप्ती जोशी साकारणार आहेत. चला हवा येऊ द्या च्या मंचावर दीप्ती जोशी यांनी हजेरी लावली होती त्यावेळी मात्र त्या कोणती भूमिका साकारणार आहेत हे गुपित ठेवण्यात आले होते. या दोन्ही पात्रांच्या एंट्रीने मालिका एक वेगळे वळण घेणार हे निश्चित. अर्थात मालिकेतून लाडू काय धमाल मस्ती घडवून आणतो हे देखील पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.