शशांक केतकर सोबत दिसणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

February 10, 2021
शशांक केतकर सोबत दिसणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

झी मराठी वाहिनीवर कोठारे व्हिजन प्रस्तुत “पाहिले न मी तुला” ही नवी मालिका प्रसारित होत आहे. येत्या १ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता ही मालिका झी वाहिनीवर प्रसारित होत आहे. या मालिकेमुळे ‘लाडाची मी लेक गं’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशीच सध्या चर्चा सुरू आहे. तुर्तास येणाऱ्या या नव्या मालिकेतील कलाकारांबद्दल अधिक जाणून घेऊयात… पाहिले न मी तुला या मालिकेचा प्रोमो नुकताच पाहायला मिळाला या प्रोमोमध्ये अभिनेता शशांक केतकर आणि माझा होशील ना मालिकेतील सुयश अर्थात अभिनेता आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

new marathi actress
new marathi actress

झी मराठी वरील नव्या मालिकेत शशांक आणि आशय सोबत दिसणारी अभिनेत्री नवखी असल्याने ती नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या नवख्या अभिनेत्रीचे नाव आहे “तन्वी प्रकाश मुंडळे”. तन्वीने मुंबई विद्यापीठातून फिजिक्स मधून बीएस्सीची पदवी प्राप्त केली आहे. अभिनयाची आवड असलेल्या तन्वीने ललित कला केंद्र मध्ये प्रवेश मिळवला होता. ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर येत्या २ जुलै २०२१ रोजी सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेला “COLORफुल” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात तन्वी देखील झळकणार आहे. हा तिने अभिनित केलेला पहिलाच चित्रपट त्यानंतर ती पहिल्यांदाच पाहिले न मी तुला या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे आणि तेही चक्क झी वाहिनीच्या मालिकेतून त्यामुळे तन्वी आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे. तन्वी मुंडळे हिला तिच्या पहिल्या वहिल्या मालिकेनिमित्त खुप खुप शुभेच्छा…