अभिनेता शशांक केतकरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडल्या त्यावर त्याने हे भाष्य केले आहे. सरकारची तत्परता पाहून त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की… कंगना राणावत याचं office अनधिकृत? असेलही… पण मग ते पूर्ण होई पर्यंत का थांबले होते सगळे ???? आधी permissions कोणी दिल्या? माझा कुठल्याही एका पार्टी वर आरोप नाही, किंवा कोणालाच support नाही कारण इथे सगळेच साले equally currupt आहेत. झोपडपट्ट्या वाढतायत, रस्त्यावर खड्डे पडतात, पूल पडतायत, नाले वाहतायत, अनधिकृत उंचच उंच towers उभे राहतायत, श्रीमंत अधिक श्रीमंत होतायत… गरीब आणखी गरीब.

shashank ketkar with wife
shashank ketkar with wife

ही post लिहिण्या मागचा उद्देश वेगळा आहे. मी एका अत्यंत सर्व सामान्य घरातला मुलगा आहे. मी 2013 मध्ये मिरा रोड ला RNA Viva नावाच्या एका complex मध्ये flat घेतला आहे जो आज 2020 मध्ये सुध्धा तशाच अपूर्ण अवस्थेत आहे आणि आणखी किती वर्ष असाच असेल याची काही गणती नाही. मला रीतसर Bank Loan मिळाले आहे. माझी सगळी कागदपत्र clear आहेत, तरीही फक्त fraud builder मुळे आणि political war मुळे आम्ही सगळे flat owners हातावर हात धरून गेली सात वर्ष बसून आहोत. आता त्या complex ला government च seal आहे आणि property वादात अडकली आहे. माझा मुद्दा हा आहे की आम्हा सामान्य नागरिकांचे पैसे वापरून हे असे रोज frauds केले जातात. फक्त मुंबईत नाही तर देशभर! मला मुंबई चा अभिमान आहे पण मुंबईतच असे हजारो अडकलेले complex असतील… ते सगळे पाडून आमचे पैसे आम्हाला परत मिळतील का? यात नेमकी कुणा कुणाची पोटं भारतायत? आमच्या मागे खरंच कुठलाच political support नाहीये, मग आमचं काय? आणि फक्त हे frauds नाहीत तर basic जगण्यासाठी आपल्याला रोज struggle करावा लागतोय त्या frauds च काय? कृपा करून… तुम्ही तर actor आहात तुम्हाला काय कमी आहे वगैरे उथळ comments करू नका. मुद्दा समजून घ्या. फक्त मुंबई चा नाही तर मला आपल्या देशाचा अभिमान आहे पण जेव्हा पदोपदी जगण्याची आणि servival ची भीती वाटायला लागते तेव्हा ? अगदी बलाढ्य देशांमध्ये सुध्धा corruption आहे, politics चालतच पण सर्व सामान्यांना अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. आपल्या कडे ? सध्याची ( सुशांत प्रकरणामुळे चालू झालेलं राजकारण) political maturity पाहता माझ्या सारख्या सामान्य माणसाचे problems कधीच solve होणार नाहीत असं दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *