विराट आणि अनुष्काच्या मुलीपेक्षा ह्या मराठी कलाकाराच्या मुलीचे फोटो होताहेत व्हायरल..

January 15, 2021
विराट आणि अनुष्काच्या मुलीपेक्षा ह्या मराठी कलाकाराच्या मुलीचे फोटो होताहेत व्हायरल..

सध्या विराट आणि अनुष्काच्या मुलीच्या फोटोंची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून आहे मात्र कालच्या दिवशी एका मराठी कलाकाराने देखील आपल्या मुलीचा फोटो शेअर करत बाप झालो असल्याची खुशखबर दिली आहेत. चला हवा येऊ शोमधून निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके , अंकुर वाढवे यासारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मुळात या शोमुळे हे सर्वच कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले असे म्हणायला हरकत नाही. आनंदाची बाब म्हणजे यातील एका कलाकाराने नुकतेच “बाप” झालो असल्याचे शोशल मिडियावरून सांगितले आहे. कन्यारत्न प्राप्त झालेला हा कलाकार आहे “अंकुर वाढवे”.

ankur wadhve daughter
ankur wadhve daughter

जुलै २०१९ रोजी अंकुरचा निकिता खडसे सोबत अगदी साध्या पद्धतीने विवाह झाला होता. काही महिन्यांनी अंकुरने स्वतःच्या मालकीचे चार चाकी वाहन देखील खरेदी केले होते. हा आनंद द्विगुणित होतो न होतो तोच अंकुर आणि निकिता काल म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आपल्या आयुष्यातील आणखी एक आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर करत त्याने एक फोटो शेअर केला आहे. ” कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो “असे कॅप्शन देऊन त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली. या फोटोत तो त्याची नुकतीच जन्मलेली मुलगी आणि पत्नीसोबत दिसत आहे. अंकुर हा उच्चशिक्षित असून त्याने अमरावती विद्यापीठातून एमए मराठी तर मुंबई विद्यापीठातून मास्टर्स इन थिएटर्स केले आहे. अंकुरला कॉलेजात असल्यापासून नाटकाची आवड होती. ‘सर्किट हाऊस’ हे अंकुरचं पहिलं व्यावसायिक नाटक. सर्किट हाऊस, करून गेलो गाव, गाढवाच लग्न अशा नाटकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला. चला हवा येऊ द्या हा शो त्याच्या आयुष्यातील यशाला टर्निंग पॉईंट देणारा ठरला. अंकुरला कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल त्याचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा…