Breaking News
Home / आरोग्य / विजय पाटकर,अलका कुबल, प्रिया बेर्डे सह तब्बल ११ कलाकारांना मोठा दणका..

विजय पाटकर,अलका कुबल, प्रिया बेर्डे सह तब्बल ११ कलाकारांना मोठा दणका..

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०१० ते २०१५ या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार भास्कर जाधव, प्रमोद शिंदे, रणजित जाधव यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली होती. यावर निर्णय देत १० लाख ७८ हजार ५९३ रुपये ही रक्कम न्यासाच्या ‘खात्यामधून’ भरावी असे नमूद करण्यात आले होते. टंकलेखनात झालेल्या या एका शब्दाच्या चुकीमुळे हे पैसे खात्यातूनच भरण्यास सांगितल्याने ते आजवर भरण्यात आले नव्हते. त्याविरोधात महामंडळातर्फे पुन्हा एकदा दाद मागण्यात आली होती .

priya and alka
priya and alka

त्यावर तब्बल तीन वर्षांनी आज या घटनेचा निकाल लागला असून टाकलेखनात झालेल्या चुकीचा शब्द “खात्यामधून” ऐवजी “खात्यामध्ये” जमा करावी अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात ही रक्कम खात्यात जमा करावी असा आदेश दिला असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
“मानाचा मुजरा” हा कार्यक्रम २०१० ते २०१५ या कालावधीत पार पडला होता. या कार्यक्रमात हा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले होते या काळात विनाकारण खर्च झाला असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. यासंदर्भात मागील कार्यकारिणीमध्ये सहभागी असलेले माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे, मिलिंद अष्टेकर, विजय कोंडके, प्रसाद सुर्वे, सतीश रणदिवे अशा तब्बल अकरा जणांचा यात समावेश होता. ही रक्कम न भरल्यास वैयक्तिक रित्या या सर्वांना आर्थिक नुकसानिस जबाबदार धरले जाईल असेही अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे या सर्वच कलाकारांना मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा दणका बसला असल्याचे उघड झाले आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *