
आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मराठी आणि हिंदी मालिकांत प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री स्वतः रिक्षा चालवून सेटवर येते असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. हिरोईनने कारनेच प्रवास करावा असं कुठं असतंय होय…हा शिक्का पुसून काढलाय एका मराठमोळ्या अभिनेत्रीने. आपल्या सहकलाकारांनी कितीही नावे ठेऊ देत पण आपल्या निर्णयावर ठाम असलेली ही अभिनेत्री याच कारणामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “यशश्री मासुरकर”. यशश्री हिने लाल इश्क मध्ये मुख्य भूमिका बजावली होती. ज्यात स्वप्नील जोशी सोबत झळकण्याची तिला संधी मिळाली होती. या चित्रपटाच्या यशानंतर तिने हिंदी भाषिक अनेक मालिका गाजवल्या आहेत.

रंग बदलती ओढणी, चक्रवर्ती अशोक सम्राट, दो दिल बंधे एक डोरी से, आरंभ यासारख्या मालिकेत तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या, यशश्री आरजेसुद्धा आहे. आपली कारकीर्द शिखरावर पोहोचत असतानाच तिने आपली कार विकून चक्क रिक्षा खरेदी केली होती. ती एवढ्यावरच थांबली नाही तर स्वतः रिक्षा चालवून ती शूटिंगला पोहोचू लागली. यावरून तिच्या सह कलाकारांनी तिची खिल्ली उडवली. परंतु यासर्वांचा तिच्यावर कुठलाच परिणाम झाला नाही. याबाबत तिने खुलासा केला की, मी कार विकून रिक्षा घेण्यामागे एक खास कारण होते. तिचा परदेशातला एक मित्र भारतात फिरायला आला होता त्यामुळे तिने आपली कार विकून रिक्षा खरेदी केली होती. त्यानंतर या रिक्षाचे काय करायचे म्हणून तिनेच ही रिक्षा स्वतः वापरण्याचे ठरवले. यामुळे माझा वेळ आणि पैसा दोन्हीतही बचत होते. ड्रायव्हर ठेवणे त्याला पगार देणे शिवाय त्याने सुट्टी घेतल्यावर येणारी अडचण ह्या बाजू लक्षात घेऊन तिनेच ती रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. ह्यामुळे तिला समाजातील गोर गरीब लोकांमध्ये वावर हि वाढला. लहान गोर गरीब मुलांसोबत ती अनेकदा फिरताना पाहायला मिळते इतकेच काय तर मुलांना शाळेत देखील सोडते. कदाचित कार असती तर तिला असं जगता आलं नसतं ह्यात एक वेगळाच आनंद आहे असे ती म्हणते. तिच्या याच कामगिरीमुळे सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. आता तिला चक्क माधुरी दीक्षित ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या रिक्षामधून मुंबई दर्शन करून द्यायची इच्छा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लहान गरीब मुलांना ती मोफत रिक्षातुन सोडते. आपल्याला जे आवडत तेच तिने केलं लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा ते खूप महत्वाचं आहे अश्या मराठमोळ्या “यशश्री मासुरकर” हिला आमचा मानाचा मुजरा…