
लागीरं झालं जी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिकेतील अजिंक्य, शीतल, मामा, मामी, जयडी, भैय्यासाहेब, राहुल हे सर्वच पात्र आपल्या सजग अभिनयाने प्रेक्षकांच्या विशेष समरणात राहिली आहेत. मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री “कमल ठोके” यांचे नुकतेच निधन झाले असल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. कमल ठोके या आपला मुलगा सुनील याच्यासोबत बंगलोर येथे राहत होत्या.

कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत त्यांची आज प्राणज्योत मालवली असल्याचे समजते आहे. उद्या कमल ठोके यांच्यावर कराड येथिल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी मालिका सृष्टीतील हळहळ व्यक्त केली जात आहे. मालिकेत त्यांनी साकारलेले जिजींचे पात्र जितके लोकप्रिय झाले होते अगदी या पात्राप्रमाणेच त्या खऱ्या आयुष्यात ही तितक्याच दिलखुलास होत्या. विशेष म्हणजे काही मोजक्या मराठी चित्रपटातूनही त्यांनी अभिनय साकारला होता. खऱ्या आयुष्यात एक आदर्श शिक्षिका असलेल्या कमल ठोके यांनी मुख्याध्यापिकेची देखील जबाबदारी पार पाडली होती. अभिनयाची त्यांची आवड मालिका तसेच चित्रपटातून पाहायला मिळाली. त्यांनी साकारलेली लागींर झालं जी मधील जिजी कायम प्रेक्षकांच्या समरणात राहील एवढे मात्र नक्की. कमल ठोके यांना आमच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली….