Breaking News
Home / आरोग्य / रसिक सुनील हिच्या अगदी जवळच्या व्यक्तीने अचानक निघून जाण्याने केली हळहळ व्यक्त

रसिक सुनील हिच्या अगदी जवळच्या व्यक्तीने अचानक निघून जाण्याने केली हळहळ व्यक्त

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनयाचे पात्र साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील मालिकेतून एक्झिट घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. खरं तर रसिका सुनीलने गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाण्याचे ठरवले होते. त्याकरणाने या मालिकेतील शनयाचे पात्र अभिनेत्री ईशा केसकर हिने निभावले होते. त्यानंतर रसिका सुनील आपले शिक्षण घेऊन पुन्हा भारतात परतल्यावर मालिकेत सक्रिय झालेली पाहायला मिळाली. पण आज तिने आपल्या आवडत्या व्यक्ती अचानक निघून गेल्याने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून हळहळ व्यक्त केली आहे.

rasika sunil family
rasika sunil family

लहानपणीची एकही आठवण अशी नाही ज्यात आजी नाही. माझे बाबा अमेरिकेत असायचे, आई , मी , माझा भाऊ यश आणि आजोबा हे सगळे घरी तेंव्हा आई घरचे बाबा होती आणि आजी घरची आई. मी बाळ असताना आजी मला अंघोळ घालायची आणि घरातील सगळ्या आरश्यात दाखवून म्हणायची “हे पहा बाळ” म्हणून माझाच चेहरा मला दाखवून हसवायची. मग शाळा सुरु होताना मला उठायला कितीही वेळ लागला तरी हळूच मला उठवून बाथरूममध्ये नेणारी, रसिक कधी तुझी दुपारची शाळा होते ग म्हणणारी, नेहमी गरमागरम जेवण वाढणारी, घरात सतत काम करणारी, कधी ना थकणारी, झोपताना नेहमी छानछान गोष्टी सांगणारी, अनेक गाणी शिकवणारी, अतिशय सुंदर गाणारी, आम्ही कीर्तनातून आलो कि अध्यात्म आणि विद्या ह्यांची किती सुंदर सांगड आहे ह्यावर चर्चा करणारी, माझी आई आजी हि काही दिवसापूर्वी वारली. आईआजी तुझं असं अचानक जाण खूप चटका देऊन गेलाय. अपघात हे तुझ्या जाण्याच कारण चुकीचंच होत. खूप आठवण येतेय .. आजी.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *