येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोहित परब ही विरोधी भूमिका साकारली आहे अभिनेता निखिल राऊतने. मालिकेत मालविकाला साथ देणारा मोहित त्याच्या कट कारस्थानामुळे प्ररक्षकांच्या रोषाचा धनी झालेला पाहायला मिळतो आहे हीच त्याच्या अभिनयाची खरी पावती म्हणावी लागेल. आज ही भूमिका साकारणाऱ्या निखिल राऊतच्या रिअल लाईफबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… निखिल राऊत एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मला असल्याने त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. परंतु काही कारणास्तव वडिलांची नोकरी गेली आणि त्यातच त्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले.

घरखर्चाला हातभार लागावा म्हणून वडिलांनी घेऊन दिलेल्या सायकलवरून घरोघरी जाऊन दूध वाटप करण्याचे ठरवले. अभिनयाचे त्याला बालपणापासूनच खूप वेड ही आवड जोपासण्यासाठी त्याच्या आईकडून खंबीर पाठिंबा मिळाला. आज मी जो काही आहे ती आईमुळेच असे तो नेहमी सांगतो. गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून तो अभिनय क्षेत्रात विविधांगी भूमिका साकारताना दिसतो. अभिनयातील एवढा दांडगा अनुभव असलेल्या निखिलने काही दिवसांपूर्वी ऑनलाइन अभिनय मार्गदर्शन कार्यशाळा चालवल्या त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. काहें दिया परदेस, तू तिथे मी, फर्जंद, फत्तेशीकस्त, वळू, शेवग्याच्या शेंगा, चॅलेंज अशा विविध मालिका ,चित्रपट तसेच नाटकांतून त्याला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. मालिकांमधून त्याला बहुतेकदा विरोधी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. काहें दिया परदेस या मालिकेत त्याला विरोधी भूमिका साकारण्याची छोटीशी संधी मिळाली होती परंतु येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत त्याने साकारलेला मोहित परब विरोधी भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या टीकेचा धनी झालेला पाहायला मिळतोय या मालिकेतून त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळालाय असेच दिसून येते. निखिल अभिनयासोबतच उत्तम कुक देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच आपल्या रेसिपी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. २२ एप्रिल २०१४ साली निखिलने मयुरी सोबत विवाह केला. मयुरी एक क्लासिकल डान्सर असून ग्लॉडीयस इव्हेंट्स अँड वेडिंग येथे वेडिंग प्लॅनर म्हणून कार्यरत आहे. निखिल राऊत ह्याला मोहितच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…