“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेतील “मोमो” नक्की आहे तरी कोण जाणून घेऊयात..

January 28, 2021
“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेतील “मोमो” नक्की आहे तरी कोण जाणून घेऊयात..

झी मराठी वाहिनीवरील नवी मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रमुख भूमिका साकारत असलेले पात्र स्वीटू आणि ओमकार यांच्यासोबतच रॉकी आणि मोमो यांच्यातील गमतीजमती या मालिकेतून पाहायला मिळत आहेत. रॉकीचे पात्र नेहमीच स्वीटूची बाजू घेत असल्याने हे पात्र लक्षवेधी ठरते. त्याचप्रमाणे मालिकेतील मोमो हि आता स्वीटूच्या बाजूने झालेली पाहायला मिळतेय. आज मोमोचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

mira in mazya navryachi bayko
mira in mazya navryachi bayko

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत मोमोचे पात्र साकारले आहे अभिनेत्री “मीरा जगन्नाथ” हिने. मीरा जगन्नाथ ही एक अभिनेत्री असून मॉडेल क्षेत्रात कार्यरत आहे. पु ना गाडगीळ ज्वेलर्स, चांदुकाका सराफ, कम्युनिटी मॅट्रोमोनि सारख्या व्यावसायिक जाहिरातीतून तीने काम केले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मीराने याअगोदर झी मराठीच्या “माझ्या नवऱ्याची बायको” या लोकप्रिय मालिकेतून संजनाचे पात्र साकारले होते. या पात्रामुळे गॅरी आणि शनया यांच्यात ब्रेकअप होते की काय असेच सर्वांना वाटत होते परंतु काही काळातच या पात्राने मालिकेतून एक्झिट घेतली होती. मध्यंतरी अभिनेत्री दीप्ती देवी हिच्यासोबत मीराने इंटिमेट फोटोशूट केले होते या फोटोशूटने साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले होते. लवकरच मीरा “लिव्ह इंडिपेंडंट ” या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे शिवाय “इलूइलू” ह्या चित्रपटातही ती महत्वाची भूमिका बजावत आहे. तुर्तास येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून मीराने साकारलेली मोमो लक्षवेधी ठरो हीच सदिच्छा…