या मराठी अभिनेत्रीची नुकतीच झाली एंगेजमेंट अनेक मालिकांत केले आहे काम

March 21, 2021
या मराठी अभिनेत्रीची  नुकतीच झाली एंगेजमेंट अनेक मालिकांत केले आहे काम

मराठी मालिका तसेच नाट्य अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिची दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १९ मार्च २०२१ रोजी एंगेजमेंट झाली आहे. वेदांगी कुलकर्णी ही अभिनेत्रीच नाही तर उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. अनेक मोठ्या मंचावर तिने आपल्या नृत्याची अदाकारी सादर करून बक्षिसे मिळवली आहेत. आज वेदांगी बद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊयात…वेदांगी कुलकर्णी ही मूळची मुंबईची डहाणूकर कॉलेज आणि डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. वेदांगी मुंबईत “व्हिक्टोरियस डान्स अकॅडमी” चालवत असून यामधून तिने अनेकांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.

tv serial actress
tv serial actress

स्टार प्रवाह वरील “साथ दे तू मला” या मालिकेतून प्राजक्ता ही प्रमुख भूमिका तिने साकारली होती. याशिवाय झी युवा वरील ‘सूर राहू दे’ मालिकाही तीने अभिनित केली आहे. लंडनच्या आजीबाई, मऊ, छडा, लौट आओ गौरी,बिलिव्ह इन सारख्या नाटक तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. एवढेच नाही तर अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर तिने झी वाहिनीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रियालिटी शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. या शोमधून वेदांगीने आपल्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या रियालिटी शो नंतर तीला अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मिळाली. मालिकांमधून सहनायीका साकारत असतानाच “साथ दे तू मला ” या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारण्याची नामी संधी तिच्याकडे चालून आली. या भूमिकेमुळे वेदांगीला खरी प्रसिद्धी मिळाली होती. मराठी मालिका तसेच नाट्य अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिला तिच्या पुढील वाटचासाठी आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *