गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी विश्वात अनेक आनंदाचे सोहळे पाहायला मिळत आहे. अभिज्ञा भावे, मिताली मयेकर यासारखे काही कलाकार लग्नबांधनात अडकत आहेत तर काही सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्या पावलांनी सुखाचे क्षण आणले आहेत. अभिनेता अंकुर वाढवे , माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील श्रेयस अर्थात अभिनेता सचिन देशपांडे यांना कन्यारत्न प्राप्त झाले. या सेलिब्रिटी पाठोपाठ आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ही अभिनेत्री आई होणार असल्याची बातमी तिने सोशल मीडियावर सांगितली होती त्यानंतरही तिचे बेबीबम्पसह कित्येकदा फोटो व्हायरल होत राहिले. चर्चेत असलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे तुझ्यात जीव रंगला मालिका फेम “धनश्री काडगावकर”.
अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने नुकतेच फेसबुकच्या माध्यमातून आज सकाळी मुलगा झाला असल्याचे कळवले आहे. तिच्या या बातमीने चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. धनश्री काडगावकर हिने तुझ्यात जीव रंगला मालिकेतून एक्झिट घेतली होती त्यानंतर ती एका डान्सच्या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर आपण प्रेग्नन्ट आहोत असे तिने सोशल मीडियावर सांगितले होते. मधल्या काळात तिच्या डोहाळजेवणाचे फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मालिकेतून एक्झिट घेऊन ती आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेत होती आणि आज गुरुवार २८ जानेवारी रोजी सकाळी तिने मुलाला जन्म दिला आहे. धनश्री व तिच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुदृढ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा….