
मैत्रीची वेगवेगळी रुपं आहेत त्यामुळे त्याला कुठल्याच एका व्याख्येत गुंडाळता येत नाही असे म्हणतात. आज अशाच एका मैत्रीची प्रचिती घडून आली… ती म्हणजे मराठी सृष्टीतील नावाजलेल्या या तिघी अभिनेत्रिंनी आपल्या मैत्रीसाठी काहीही म्हणत आपल्याच डोक्याच्या मागील बाजूचे केस मुळासकट काढून टाकले आहेत. खरं तर या तिघीही मराठी मालिका, चित्रपट तसेच नाट्य सृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांचे हे कृत्य पाहून अनेक जण अवाक झालेले पाहायला मिळत आहेत तर अनेकांनी बिनधास्त मुली अशीही व्याख्या दिलेली पाहायला मिळते आहे. पण या तिघी मैत्रीणी नेमक्या आहेत तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल…चला तर मग जाणून घेऊयात या तिघींच्या भन्नाट मैत्रीबद्दल…

फोटोमध्ये पाठमोऱ्या उभ्या असलेल्या या तिघी अभिनेत्री आहेत “मनवा नाईक, आदिती सारंगधर आणि अमृता संत”. नुकतेच या तिघींनी एकत्र येत आपल्या मैत्रीतील मजामस्ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर करून मनवा नाईकने are we friends or what? असे म्हणत डोक्याच्या पाठीमागील भागाचे केस मुळासकट काढून टाकले आहेत. या व्हिडिओत या तिघी भलत्याच खुश देखील झालेल्या पाहायला मिळत आहेत. मैत्रीमध्ये या तिघी अशा काही भन्नाट कल्पना करू शकतील याचा कोणीच विचार केला नसावा. त्यांच्या या बिनधास्तपणाचे अनेकांनी कौतुकही केले आहे. तर काही जणांनी ‘तुम्ही mad मुली आहात’ असेही म्हटले आहे. मनवा नाईक सध्या मालिकेतून काम करत नसली तरी एक निर्माती म्हणून ती या क्षेत्रात स्थिरस्थावर आहे. तर आदिती सारंगधर स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून बेगम साहिबाची भूमिका बाजवत आहे. अमृता संत अनेक नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे. मनवा, अमृता आणि आदिती या तिघी मैत्रिणी अनेकदा एकत्रित पाहायला मिळतात. तूर्तास त्यांची ही मैत्री अशीच अबाधित राहो …