स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. मालिकेतील नायिका अर्थात न बोलता येणारी माऊ आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि हवभावाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. या मालिकेतून योगेश सोहोनी याने शौनक या प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. माऊ आणि शौनक यांची जुळून आलेली केमिस्ट्री यासोबतच शर्वानी पिल्लई यांनी साकारलेली माऊची आई देखील भाव खाऊन जाते. आज मालिकेतील माऊची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

माऊची भूमिका साकारली आहे “दिव्या सुभाष पुगावकर” या अभिनेत्रीने. मालिकेत माऊ मुकी असल्याने तिचे कधीही न बोलणारे पात्र दर्शवले आहे परंतु खऱ्या आयुष्यातील माऊला बोलता येते बरं का. दिव्या मूळची माणगावची परंतु तिचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले आहे. दिव्याने या मालिकेअगोदर प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या लोकप्रिय मालिकेतून काम केले आहे. मुलगी झाली हो या मालिकेतून तिला पहिल्यांदा प्रमुख नायिका साकारण्याची संधी मिळाली. अभिनयासोबतच दिव्याला मॉडेलिंगची देखील आवड आहे. २०१७ साली मुंबईची सुकन्या स्पर्धेत तीने मोस्ट पॉप्युलर फेसचे मानांकन प्राप्त केले. तर २०१९ सालच्या श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवून दिव्याने मिस टॅलेंटेडचा मानही पटकावला आहे. दिव्याने साकारलेल्या माऊच्या भूमिके वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे तिला या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा..