माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत मोठा ट्विस्ट… शनयाची याकारणामुळे होणार एक्झिट

December 21, 2020
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत मोठा ट्विस्ट… शनयाची याकारणामुळे  होणार एक्झिट

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनयाचे पात्र साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील मालिकेतून एक्झिट घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. खरं तर रसिका सुनीलने गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाण्याचे ठरवले होते. त्याकरणाने या मालिकेतील शनयाचे पात्र अभिनेत्री ईशा केसकर हिने निभावले होते. त्यानंतर रसिका सुनील आपले शिक्षण घेऊन पुन्हा भारतात परतल्यावर मालिकेत सक्रिय झालेली पाहायला मिळाली. अर्थात मालिकेत तिच्या परतण्याने चाहते देखील तितकेच सुखावले हे वेगळे सांगायला नको. परंतु नुकतेच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समजते आहे.

rasika sunil mazya navryachi bayko
rasika sunil mazya navryachi bayko

ह्या ट्विस्टमध्ये शनया आणि तिचा बॉयफ्रेंड कुणालची भेट होणार असून ते दोघेही परदेशात जाणार असल्याची चर्चा आहे. सध्या कुणाल चे पात्र गुलदस्त्यात असले तरी हे पात्र नक्की कोणता कलाकार निभावणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. शनया सध्या राधिका मसाले सोबतच एक रेडीओ जॉकी म्हणून दोन जबाबदाऱ्या सांभाळत आहे. रेडिओजॉकी मधील बिंदुराणी ही शनयाच असल्याचे तिचा बॉयफ्रेंड कुणाल ने ओळखले आहे. त्यामुळे हा कुणाल लवकरच शनयाला भेटणार आहे.. परंतु कुणालचे हे पात्र जेव्हा मालिकेत एन्ट्री घेईल त्यानंतर मालिकेत एक मोठा बदल घडून येऊन शनया आणि कुणाल दोघेही परदेशात जाणार आहेत. याकारणास्तव पुन्हा एकदा शनयाचे पात्र साकारणारी रसिका आता लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार आहे. ती थोड्या दिवसांसाठी एक्झिट घेणार की या मालिकेतून कायमची एक्झिट घेणार हे अजून ठरलेले नसले तरी शनयाचे असे जाणे प्रेक्षकांना नक्कीच रुचणार नाही हे मात्र तितकेच खरे..