माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेत्रीच्या सख्या बहिणीचा नुकताच झाला साखरपुडा

January 4, 2021
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेत्रीच्या सख्या बहिणीचा नुकताच झाला साखरपुडा

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून माया चे पात्र साकारले आहे अभिनेत्री “रुचिरा जाधव” हिने. रुचिराने याआधी अनेक टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून तिने नुपूरची भूमिका साकारली होती. शुद्ध देसी या युट्युब चॅनलवरील माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसिरीज खेरीज प्रेम हे (झी युवा), बे दुणे दहा(स्टार प्रवाह), माझे पती सौभाग्यवती(झी मराठी) अशा आणखी काही मालिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली.

rutuja jadhav
rutuja jadhav

परंतु यासर्वांमधून झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधून तीने साकारलेल्या मायाला जास्त प्रसिद्धी मिळाली. रुचिराला एक सख्खी बहीणही आहे तिचे नाव “ऋतुजा”. रविवारी ३ जानेवारी रोजी ऋतुजा आणि अंकित ढगे यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानिमित्त मराठी कलाकारांनी या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अंकित ढगे एक सोशल वर्कर असून मुंबईतच तो स्थायिक आहे. तर ऋतुजा आपल्या बहिणीप्रमाणेच कला क्षेत्राशी निगडित आहे एक फॅशन मॉडेल म्हणून ती मॉडेलिंग क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. फ्लेमिंगो ह्या प्रसिद्ध फिटनेस ब्रँड प्रॉडक्ट्ससाठी तिने काम केले आहे. ह्या ब्रँडचा ब्रँड अँब्यासिडर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या दोघी बहिणींनी कला क्षेत्रात बसवलेला आपला जम खूपच कौतुकास्पद म्हणावा लागेल. तुर्तास ऋतुजा आणि अंकीतला साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा….