आरोग्य

माझा होशील ना मालिकेतील सुलेखा तळवलकर यांची मुलगी दिसते खूपच सुंदर… आईसोबत मिळून करते हे काम

झी मराठीवरील माझा होशील ना मालिकेत सईच्या आईची अर्थात शर्मिला बिराजदारची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी. असंभव, कुंकू, असे हे कन्यादान, धुरळा, कदाचित, अग्निहोत्र, चार दिवस सासूचे, अवंतिका, ‘तेरी भी चूप मेरी भी चूप, श्रीमान श्रीमती अशा हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपटातून सुलेखा तळवलकर यांनी आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. विरोधी भूमिका असो वा नायिका, सह नायिकेच्या भूमिका त्या त्यांनी तितक्याच नेटाने सांभाळल्या.

sulekha talwalkar daughter
sulekha talwalkar daughter

माझा होशील ना या मालिकेसोबतच सांग तू आहेस का या मालिकेत त्या सध्या अभिनय साकारत आहेत. रुईया कॉलेजमध्ये असताना नाट्यवलय या नाट्यसंस्थेशी त्या जोडल्या गेल्या. इथूनच रंगभूमीशी त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. नाटक मालिकेतून काम करत असताना अंबर तळवलकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. दिवंगत अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्या त्या सून आहेत अंबर तळवलकर हा त्यांचाच मुलगा. सुलेखा आणि अंबर तळवलकर यांना आर्य आणि टिया ही दोन अपत्ये. टियाला ज्वेलरी डिझायनिंग करण्याची आवड आहे याशिवाय वेगवेगळ्या रेसिपीज बनवणे तिला खूप आवडते. आपली आई सुलेखा तळवलकर यांच्यासोबत ती त्यांच्या नावाने सुरू असलेल्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करताना दिसते. त्यांच्या या व्हीडीओजना मोठा प्रतिसाद देखील मिळतो आहे. टिया दिसायलाही खूपच सुंदर आहे. तळवलकर ग्रुप्सचे विविध ठिकाणी फिटनेस सेंटर आहेत त्यांची जबाबदारी देखील ती सांभाळताना दिसते. टिया आपली आज्जी स्मिता तळवलकर आणि आई सुलेखा यांच्या प्रमाणे अभिनय क्षेत्रात उतरली नसली तरी एका वेगळ्या क्षेत्रातून ती आपले करिअर घडवू पाहत आहे. टियाला तिच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button