
झी मराठीवरील “माझा होशील ना” ही मालिका एका रंजक वळणारवर येऊन ठेपली आहे. आदित्य आणि सई यांची लव्हस्टोरी आता हळूहळू खुलत जाणार असल्याने त्यांची ही जुळून आलेली केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले पाहायला मिळतात. परंतु दादा मामांनी सून म्हणून पसंत केलेल्या मेघनाला मात्र ते कसा नकार देतात हेही रंजक होणार. तूर्तास आदित्यने मेघनाशी लग्न करण्यास नकार दिला असला तरी दादा मामांनी आदित्य आणि मेघनाच्या लग्नाची स्वप्ने पाहिलेली असतात. या मेघनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेऊयात…

मेघना ची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “सानिका गाडगीळ” हिने. सानिका गाडगीळ हिने या मालिकेआधी स्टार प्रवाहवरील “मोलकरीणबाई” या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेतून सानिकाने निशाची भूमिका साकारली होती. निशाचे पात्र प्रमुख असल्याने तिची ही भूमिका तिच्या आयुष्यात अधोरेखित करणारी ठरली आहे. सेंट अँन्ड्रीव्हज कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून तीने बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी प्राप्त केली आहे. यासोबत ती कथक नृत्य विशारद देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नृत्याची कला ती देशभरातील विविध मंचावर सादर करताना दिसते. बॅरी जॉन ऍक्टिंग स्कुलमधून तीने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. कंजूस, मुघल ए आझम अशा नाटकांतूनही तिने रंगभूमीवर काम केले आहे. माझा होशील ना मालिकेत मेघनाची भूमिका छोटीशी जरी असली तरी तीची ही भूमिका प्रेक्षकांच्या समरणात राहते. सानिका गाडगीळ हिला या भूमिकेसाठी तसेच पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा…