Breaking News
Home / आरोग्य / मराठी सृष्टीतील हे ३ प्रसिद्ध कलाकार आज जगत आहेत हलाकीचे जीवन…३ री अभिनेत्री झाली आर्थिक परिस्थितीमुळे हतबल

मराठी सृष्टीतील हे ३ प्रसिद्ध कलाकार आज जगत आहेत हलाकीचे जीवन…३ री अभिनेत्री झाली आर्थिक परिस्थितीमुळे हतबल

आयुष्याच्या सरत्या काळात कुणाच्याही वाट्याला हालअपेष्टा येऊ नयेत अशीच एक माफक अपेक्षा असते परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आलेले आजारपण याच्यापुढे कोणाचे काही चालत नाही असेच चित्र पाहायला मिळते. मराठी सृष्टीतही असे कलाकार आहेत जे आजच्या घडीला आलेल्या संकटांना सामोरे जाताना दिसत आहेत. परिस्थितीशी दोन हात करत आलेल्या संकटांना तोंड देत हे कलाकार आज आपले जीवन व्यतीत करत आहेत त्यातील हे तीन प्रसिद्ध कलाकार कोण आहेत ते जाणून घेऊयात…

raghvendra kadkol pic
raghvendra kadkol pic

झपाटलेला या गाजलेल्या चित्रपटातून मृत्युंजय मंत्र सांगणारे “बाबा चमत्कार” हे पात्र सर्वांना आठवत असेल. ही भूमिका गाजवली आहे “राघवेंद्र कडकोळ” या कलाकाराने. झपाटलेला, झपाटलेला २ या दोन्ही चित्रपटांतील त्यांनी वठवलेली “बाबा चमत्कार” ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे. पण या अभिनेत्यावर आज हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करण्याची वेळ आली आहे. प्रसिद्धी मिळाली मात्र पैसा कमावता आला नाही याची खंत त्यांना लागून आहे. राघवेंद्र आता त्यांच्या पत्नी लतिका कडकोळ यांच्यासोबत पुण्यातील बावधन येथील ‘पालाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर’ येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. तिथेच ते आपल्या पत्नीसोबत राहत आहेत. राघवेंद्र कडकोळ यांच्याप्रमाणे मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री आपल्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. झपाटलेला याच चित्रपटातील या अभिनेत्री आहेत “मधू कांबीकर “.

madhu kambikar actress
madhu kambikar actress

शापित, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेली नायिका, सह नायिका, तर कधी आई ही प्रेक्षकांच्या विशेष संस्मरणीय ठरल्या. आज मधू कांबीकर कला क्षेत्रापासून दूर का आहेत त्याचे एक कारण आहे. पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील गोपीनाथ सावकार प्रतिष्ठान तर्फे यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला. आज मधू कांबीकर याच आजारपणामुळे कला क्षेत्रापासून दुरावलेल्या आहेत. राघवेंद्र कडकोळ आणि मधू कांबीकर आजारपणामुळे परिस्थिशी दोन हात करत आहेत पण यात आणखी एका अभिनेत्रीला चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या अभिनेत्री आहेत “सुरेखा राणे उर्फ ऐश्वर्या राणे”.

surekha rane actress
surekha rane actress

धुमधडाका या गाजलेल्या चित्रपटात सुरेखा राणे यांनी अशोक सराफ यांची नायिका साकारली होती. प्रियतम्मा प्रियतम्मा.. ह्या गाण्यात त्या झळकल्या आहेत. धुमधडाकासह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह ‘भटकभवानी’ या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘शराबी’, ‘नमक हलाल’ अशा हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं आहे. अमिताभ बच्चन, निळू फुले, परवीन बाबी, जयश्री गडकर यांच्यासारख्या कलाकारांसह त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. मात्र बिग बींच्या ‘मर्द’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान डबिंग आर्टिस्टचे काम करत असताना त्या घोड्यावरुन पडल्या. या अपघातात त्यांच्या पाठीचे हाड मोडले त्यामुळे ऐन भरात असलेल्या करिअरला अनपेक्षित ब्रेक लागला. या दुखण्याच्या उपचारापायी सुरेखा यांना आपलं मुंबईचं घरही विकावं लागलं. काम सुटलं, नातेवाईक अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली. नियतीने त्यांच्यावर हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणली. चित्रपटसृष्टीत इतकं योगदान देऊनही तुटपुंजं पेन्शन मिळवून चरितार्थ चालवण्यासाठी सुरेखा राणे यांना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागले होते. अशा या हलाखीच्या परिस्थितीत कुणीही जवळचं नसल्याने आज त्या एकट्याच राहतात.
त्यामुळे चंदेरी दुनियेत उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं, प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही किंवा एखाद्या गंभीर आजारपणाला तोंड द्यावे लागते हेच या कलाकारांचे दुर्दैव…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *