marathi actress mother

अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलेल्या कलाकारांची मुले देखील याच क्षेत्रात आपला जम बसवताना पाहायला मिळतात. आपल्या सजग अभिनयातून या कलाकारांनी नाटक, चित्रपट तसेच मालिका क्षेत्रातही उत्तमोत्तम भूमिका साकारून आपले स्थान कायम टिकवून ठेवलेले पाहायला मिळते. त्यातील बरेच कलाकार हे आजही प्रसिद्धीच्या झोतात असलेले दिसून येतात. त्यातीलच काही निवडक माय-लेकींच्या जोड्या आज आपण जाणून घेणार आहोत…

kanchan and purva gokhale
kanchan and purva gokhale

१. पूर्वा गोखले आणि कांचन गुप्ते- अभिनेत्री पूर्वा गोखले हिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून राणी सईबाई साकारल्या होत्या. कुलवधू ही तिने अभिनित केलेली पहिली मराठी मालिका. मराठी मालिकेव्यतिरिक्त पूर्वाने कहाणी घर घर की, कोई दिल में है, तुजसे है राबता अशा अनेक हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलेली पाहायला मिळते. सेल्फी हे मराठी नाटकही तिने रंगभूमीवर गाजवलेलं पाहायला मिळालं. पूर्वा गोखले हिची आई कांचन गुप्ते या देखील रंगभूमीवरील जाणत्या कलाकार. महाविद्यालयात असताना त्यांनी पद्मश्री धुंडिराज हे पहिले नाटक साकारले होते. शुभं भवतु सारखे चित्रपट तसेच जावई विकत घेणे आहे, घाडगे अँड सून, माझ्या नवऱ्याची बायको अशा मालिकांमधून त्या प्रेक्षकांसमोर येत राहिल्या. मधल्या काळात त्यांनी स्टेट बँकेत नोकरी देखील स्वीकारली होती.

amruta subhash jyoti subhash
amruta subhash jyoti subhash

२. अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष- अभिनेत्री अमृता सुभाष हिने मराठी सृष्टी पाठोपाठ हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली पाहायला मिळते. मसाला, बालक पालक, किल्ला, अस्तू, गल्लीबॉय, सेक्रेड गेम्स २, झिपऱ्या, गंध अशा अनेक चित्रपटातून अमृताने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अमृताने अभिनेता, दिग्दर्शक संदेश कुलकर्णी सोबत लग्न केले आहे. अमृताने तिची आई ज्योती सुभाष यांच्यासोबतदेखील अनेक चित्रपटातून एकत्रित काम केले आहे. ज्योती सुभाष यांचे पूर्ण नाव ज्योती सुभाषचंद्र ढेंबरे. रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर दूरदर्शनवरील मालिका तसेच मराठी-हिंदी चित्रपट , मालिका असा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय ठरलेला पाहायला मिळाला.

kshiti jog mother
kshiti jog mother

३. क्षिती जोग आणि उज्वला जोग- दामिनी, वादळवाट, गंध फुलांचा गेला सांगून, फू बाई फू या टीव्ही मालिका तसेच आनंदी गोपाळ, संशय कल्लोळ, चोरीचा मामला अशा अनेक मराठी चित्रपटातून अभिनेत्री क्षिती जोग हिने महत्वाच्या भूमिका बजावल्या. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक साकारत असतानाच क्षितीने हिंदी टीव्ही मालिकेतही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली पाहायला मिळते. ये रिश्ता क्या केहलाता है, ये रीश्ते है प्यार के, घर की लक्ष्मी बेटीयां अशा अनेक हिंदी टीव्ही मालिकेतून क्षिती प्रेक्षकांसमोर आली.क्षिती ही मराठी चित्रपट अभिनेते- दिग्दर्शक हेमंत ढोमे सोबत विवाहबद्ध झाली. क्षिती ही मराठी हिंदी चित्रपट अभिनेते ‘अनंत जोग’ यांची मुलगी तर तिची आई ‘उज्वला जोग’ या देखील मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. उज्वला जोग यांनी नवरा बायको, सौभाग्य कांकन, कुंकू लावते माहेरचं, ढोल ताशे, लुका छुपी, सूर्याची पिल्ले अशा मालिका तसेच नाटक अभिनित केले आहेत. सोनी मराठीवरील ह म बने तू म बने मालिकेतून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

tejaswini pandit jyoti pandit
tejaswini pandit jyoti pandit

४. तेजस्विनी पंडित आणि ज्योती पंडित- केदार शिंदे दिग्दर्शित अगबाई अरेच्चा! चित्रपटातून तेजस्विनी पंडित हिने विरोधी भूमिका साकारून साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलेले पाहायला मिळाले होते. देवा, गैर, तू ही रे, एक तारा, ये रे ये रे पैसा अशा अनेक चित्रपटातून तीने प्रमुख भूमिका साकारल्या. तर तेजस्विनी पंडित हिची आई ज्योती चांदेकर- पंडित या देखील मराठी नाट्य तसेच सिने सृष्टीतील जाणत्या कलाकार. सांजपर्व, गुरू, ढोलकी, दमलेल्या बाबाची कहाणी, पाऊलवाट या चित्रपटातून त्यांनी काम केले आहे. त्यांनी अभिनित केलेले मिसेस आमदार सौभाग्यवती हे नाटकही चांगलेच गाजले होते. तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर या मायलेकींनी एकत्रित ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपट साकारला होता ज्यात तेजस्विनीने देखील तरुणपणीच्या सिंधुताई सपकाळ साकारलेल्या पाहायला मिळाल्या.

manva naik meena naik
manva naik meena naik

५. मनवा नाईक आणि मीना नाईक- मनवा नाईक ही मराठी चित्रपट अभिनेत्री तसेच एक दिग्दर्शिका म्हणूनही ओळखली जाते. २०१४ साली पोरबाजार चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले होते. क्षणभर विश्रांती, शहाणपण देगा देवा, दम असेल तर, काकस्पर्श, नो एन्ट्री -पुढे धोका आहे, पिंडदान अशा अनेक मराठी चित्रपटासोबतच मनवा नाईक हिने जोधा अकबर या बॉलिवूड चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मनवा नाईक ही प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांच्या कन्या. मीना नाईक यांनी हृदयांतर, यशवंतराव चव्हाण, ढिनच्याक एंटरप्राइज हे चित्रपट अभिनित केले आहेत. अभिनयासोबतच मीना नाईक या संवेदनशील लेखिका तसेच सुत्रसंचालिका म्हणूनही ओळखल्या जातात. किलबिल, अमृत मंथन अशा दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. काही संवेदनशील लघुपट आणि अनिमेशन फिल्म्सही त्यांनी बनवल्या आहेत. शिवाय देश विदेशात लहान मुलांसाठी कार्यशाळा तसेच जागृती कार्यक्रम देखील त्यांनी आयोजित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *