चंदेरी दुनियेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातात. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून तर ते अतिशय सोपे बनले असल्याने यांच्या माध्यमातून कुठल्या गाण्याचा व्हिडीओ अथवा कुठली एखादी कला सादर करून चर्चेत राहता येते. परंतु आपला स्वतःचा लूक बदलून काही हटके अंदाजात देखील कलाकार चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत मग त्यात मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री देखील मागे कशा राहतील जाणून घेऊयात याबाबत अधिक …. ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून “नेहा गद्रे” ही अभिनेत्री घराघरात पोहोचली होती. तिनं साकारलेली गौरीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

त्यानंतर ‘अजूनही चांद रात आहे ‘ या मालिकेत रेवाची भूमिका तिनं साकारली. ‘मोकळा श्वास’ चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत नेहा दिसली होती तर ‘गडबड झाली’ हा आणखी एक चित्रपट तीने अभिनित केला. २०१९ साली अश्विन बापट सोबत ती विवाहबद्ध झाली. लग्नानंतर नेहा ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली काही दिवसांपूर्वीच नेहाने एक फोटो शेअर केला एका वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये नेहाला पटकन ओळखणे देखील तिच्या चाहत्यांना कठीण झाले होते. परंतु तिच्या या अनोख्या लुकचे त्यांनी स्वागतही केले.
नेहा गद्रे पाठोपाठ मराठी मालिका अभिनेत्री “मृणाल दुसानिस” हिची देखील अशाच हटके लूकमुळे चर्चा रंगली आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीला एक सोज्वळ, सुंदर चेहरा भेटला तो म्हणजे मृणाल दुसानीस हिचा. आपल्या साध्या-सरळ स्वभावाने आणि सालस सौंदर्याने मृणालने सर्वांना भूरळ पाडली होती. त्यामुळे तिला ह्याच लूकमध्ये पाहण्याची सवय झाली होती. परंतु हे मन बावरे मालिकेनंतर मृणाल सध्या तिच्या नवऱ्यासोबत (नीरज मोरे) अमेरिकेत आहे.

काही दिवसांपूर्वीच मृणाल ने देखील हेअरस्टाईल चेंज करून एक फोटो शेअर केला. या अनोख्या लूकमध्ये मृणाल अधिकच खुलून दिसत होती. साधी सरळ इमेज पुसून काढत ती एका ग्लॅमरस लूकमुळे चांगलीच चर्चेत येऊ लागली.
नेहा गद्रे आणि मृणाल दुसानिस या दोघींसोबत आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या लूकमध्ये बदल केला आहे ही अभिनेत्री आहे “भार्गवी चिरमुले”. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून भार्गवीने जिजाबाई मातोश्रींची भूमिका साकारली होती. मालकेने लीप घेतल्या कारणाने ही भूमिका सध्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी साकारत आहेत. मालिकेनंतर भार्गवीने आपल्या लूकमध्ये केलेला अनोखा बदल खूपच भाव खाऊन जात आहे. साध्या, सोज्वळ लुकला डावलून तिने केलेले हे स्टायलिश फोटोशूट सध्या जोरदार चर्चेत आहे. आपल्या बदललेल्या या लुकमुळे या अभिनेत्री चर्चेत येऊ लागल्या आहेत. त्यांनी केलेला हा बदल चंदेरी दुनियेत टिकून राहण्यासाठी असो वा स्वछंदी जगण्याची राहिलेली एक अपुरी ईच्छा… कारण काहीही असो, मात्र या हटके लुकमध्येही या कलाकारांना त्यांच्या चाहत्यांनी आपलेसे केलेले पाहायला मिळत आहे..