मराठीतील या दोन चर्चेत असलेल्या अभिनेत्यांची गर्लफ्रेंड पहिलीत का? एक आहे प्रसिद्ध अभिनेत्री तर दुसरी आहे..

झी वाहिनीच्या दोन मालिका सध्या चांगल्याच फेमस झालेल्या आहेत एक म्हणजे “माझा होशील ना” आणि दुसरी नुकतीच प्रदर्शित झालेली ” येऊ कशी तशी मी नांदायला”. ह्या दोन्ही मालिकांनी खूप कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ह्याच दोन मालिकांतील कलाकार आज झी मराठी वाहिनीवरील मालिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या “विराजस कुलकर्णी” आणि “शाल्व किंजवडेकर ” या दोन प्रमुख आणि नवोदित अभिनेत्यांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

“माझा होशील ना” या झी मराठीवरील मालिकेमुळे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा म्हणून ओळख मिळालेल्या “विराजस कुलकर्णी”ने मालिकेतील आदित्यच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. परंतु विराजस सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे आणि ते म्हणजे तो चक्क एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे आणि ती अभिनेत्री आहे “शिवानी रांगोळे. शिवानी आणि विराजस दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा ह्या त्यांच्याच पोस्टवरून अनेकदा समोर आलेल्या दिसून येतात. ह्या दोघांना बऱ्याचदा इव्हेंटमध्येही एकत्रित पाहिले गेले असल्याने त्यांच्या चाहत्यांनी त्यांना बेस्ट कपल म्हणून शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात. नुकत्याच पार पडलेल्या मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या विवाहसोहळ्यात या दोघांनी हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या एकाच थिमच्या कपड्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. विराजस आणि शिवानी यांच्याप्रमाणे मराठी मालिका सृष्टीतील नवोदित कलाकार “शाल्व किंजवडेकर” याच कारणामुळे चर्चेत आहे.

‘ येऊ कशी तशी मी नांदायला’ या पहिल्या वहिल्या मालिकेमुळे शाल्व किंजवडेकर हा नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. परंतु याअगोदर बकेट लिस्ट , एक सांगायचंय, डेड एन्ड सारख्या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावरही झळकला आहे. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील ओमकारच्या भूमिकेमुळे शाल्व किंजवडेकर तरुणींना घायाळ करतोय परंतु हो… शाल्व रिअल लाईफमध्ये सिंगल नसून त्याच्या आयुष्यात एक ‘स्वीटू’ आहे बरं आणि या खऱ्या स्वीटूचे नाव आहे “श्रेया डफळापूरकर”. शाल्व किंजवडेकर हा त्याची मैत्रीण श्रेयाला डेट करत आहे. श्रेया देखील कला क्षेत्राशी निगडित आहे. सध्या मराठी इंडस्ट्रीत ट्रेंडमध्ये असलेल्या ‘तलम’ या फॅशन ब्रँडची फाउंडर म्हणून श्रेया डफळापूरकर हे नाव चर्चेत आहे आणि शाल्व किंजवडेकर हा श्रेयाचा बॉयफ्रेंड आहे. अनेकदा या दोघांचे फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी खास मानले जातात आणि आता तर मालिकेमुळे चर्चेत असल्यानेही या दोघांची चर्चा पाहायला मिळत आहे.