देवमाणूस मालिकेत सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मंजुळाच्या जाण्याला डॉक्टरच जबाबदार आहेत असे सरू आज्जीने म्हटल्यानंतर पोलिसही डॉक्टरांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. मात्र ही वेळही डॉक्टर आपल्या चलाखीने निभावून नेताना दिसत आहेत. मंजुळाच्या एक्झिट नंतर मालिकेत पुढे काय घडणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याची उत्सुकता अधिक ताणून न धरता आता लवकरच या मालिकेत आणखी एका सावजाची एन्ट्री होत आहे. अर्थात हे सावज म्हणजे स्त्रीपात्रच असणार हे वेगळे सांगायला नको. मालिकेत ज्या कलाकाराची एन्ट्री होत आहे त्या अभिनेत्रीचे नाव आहे “नेहा खान”.

नेहा खान ही अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून हिंदी, मराठी सृष्टीत परिचयाची आहे. नेहा मूळची अमरावतीचे इयत्ता आठवीत शिकत असताना तिने मॉडेलिंग कॉम्पिटीशन मध्ये सहभाग घेतला होता. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्र हा किताब तीने पटकावला . २०१४ साली अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कुल मधून तिने अभिनयाचे धडे गिरवले. ‘बॅड गर्ल’, ‘काळे धंदे’ , ‘शिकारी, ‘मुंबई सिटी’, ‘गुरुकुल’, ‘हाफ ट्रुथ’ अशा मराठी तसेच हिंदी चित्रपटातून तिने भूमिका साकारल्या. बियॉन्ड बॉर्डर्स या मल्याळम चित्रपटातही ती झळकली आहे. तिने साकारलेल्या बहुतांश चित्रपटात ती बोल्ड भूमिकेतच जास्त पाहायला मिळाली. झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये तिने पार्टीसिपेट केले होते त्यात तिने आपल्या नृत्याची अदाकारी दाखवून दिली. बोल्ड अँड ब्युटीफुल नेहा आता देवमाणूस मालिकेत एन्ट्री घेत असल्याची चर्चा आहे. ती या मालिकेतून नेमक्या कोणत्या भूमिकेत पाहायला मिळते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.