सोशल मीडियाला काही दिवसांपूर्वीच राम राम ठोकलेला मराठमोळा अभिनेता आज अचानक केलेल्या एका पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच का रे दुरावा मालिका फेम सुयश टिळक याने आपल्या इंस्टाग्रामवरून एक्झिट करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतरची त्याची ही पोस्ट आता चर्चेत येत आहे या पोस्टमध्ये त्यानं प्रेम करण्याव्यक्तीबद्दल, खास नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहे. एखाद्यावर प्रेम केलं तर ते निस्वार्थी असावं, आपल्या जोडीदाराच्या कठिण काळात त्याच्या पाठिशी उभं राहायला हवं,

तुम्ही एकटे नाहीत असेही आश्वस्त करत प्रेमाबद्दल त्याने या पोस्टमध्ये मनातल्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुयश टिळक आणि तुझ्यात जीव रंगला मालिका अभिनेत्री अक्षया देवधर यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. यालाच अनुसरून त्याने ही पोस्ट तर नाही ना लिहिली असेही सध्या बोलले जात आहे. अक्षया आणि सुयश गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर देखील अनेकदा व्हायरल झाले त्यावरून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असेच म्हटले जात होते. २०१८ साली अक्षया आणि सुयशने एकत्रित काढलेला एक फोटो शेअर केला होता त्यात अक्षयाच्या बोटातील अंगठी पाहून चाहत्यांनी त्यांचा साखरपुडा झाला असल्याचे वर्तवले होते परंतु या सर्व अफवा आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले होते. सुयश आणि अक्षया यांच्या ब्रेकअप च्या बातमीनंतर आता सुयशने लिहिलेली ही पोस्ट बरेच काही सांगून जात असली तरी त्याने हे कशामुळे लिहिले आहे हीच चर्चा पाहायला मिळत आहे.