
हिंदी बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी सलमान खानवर निशाणा साधला होता. बिग बॉसच्या घरात असताना बिचुकले यांना सलमान खानचा ओरडा खावा लागला होता. मात्र शोमधून मी लोकांचे मनोरंजन केले होते माझ्यामुळे हा शो गाजला आणि ऐन वेळी मला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले याचा राग मनात धरून बिचुकले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सलमानला धारेवर धरत असे शंभर सलमान माझी गल्ली झाडायला ठेवीन , तो भाई असेल तर मी दादा आहे, मी स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस उभारतोय.

माझा चित्रपट तू रोखून दाखव असा संताप व्यक्त करत सलमानला खुले आव्हानच त्यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. सलमान खानवर निशाणा साधल्यामुळे अभिजीत बिचुकले यांना बिग बॉसच्या फिनलेमध्ये देखील आमंत्रित केले नव्हते. हाही राग बिचुकले यांच्या मनात सतत घोंगावत होता. बिग बॉसच्या निर्मात्या टीमला देखील त्यांनी प्रश उपस्थित होता की सलमान खान तुमच्या शो मध्ये नोकर म्हणून काम करतो की तो या कंपनीचा मालक आहे? असे स्पष्टीकरण त्यांनी बिग बॉसकडे मागितले होते. गेल्या अडीच महिन्यांपासून बिग बॉसच्या घरात असल्याने बाहेर काय चाललंय याचा ठाव नसलेल्या बिचुकलेंना वाईन संदर्भातली बातमी कळली तेव्हा बिचुकले यांनी आश्चर्य व्यक्त केले होते आणि सरकारचा निर्णय खूप चुकीचा आहे असे पत्रकार परिषदेत म्हटले होते. ‘उद्धव दादा तुम्ही बाळासाहेबांचे आचार विचार विसरू नका, किराणा दुकानात आणि मॉल मध्ये जर वाईन विकायला ठेवली तर लहान मुलं देखील त्या व्यसनाच्या आहारी जातील. आपली येणारी पिढी बरबाद होईल.

मला दारूचं अजिबात व्यसन नाही खडाचं देखील व्यसन मला नाही अगदी माझ्या संपूर्ण शरीरात जरी तपासणी केली तरी माझ्या रक्तात दारूचा थेंब सुद्धा कुणाला आढळणार नाही. सरकारचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे . किराणा दुकानात गल्ली गल्लीत वाईन भेटायला लागली तर आपल्या आया बहिणींना दुकानात जायला भीती वाटेल. तुम्हाला विकायचंच असेल तर बिचुकले अँड सन्स स्वीटसचे सातारी कंदी पेढे आहेत ते विका, पेढे दुधाचे आहेत आणि त्यातून ताकद मिळेल येणारी पिढी सुदृढ होईल…’ असे म्हणत बिचुकले यांनी उद्धव ठाकरे सरकारला किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन न विकण्यासाठी विनंती केली आहे. अनेक मराठी तरुण मंडळी बिचकुले यांना नेहमी सपोर्ट करताना पाहायला मिळतात तो सामान्य माणूस असला तरी तो चांगले विषय न घाबरता मांडतो असं अनेकांचं मत आहे.