
२०१२ साली बीपी अर्थात बालक पालक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. किशोरवयीन मुलांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची खूप चर्चा देखील झालेली पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील डॉलीची भूमिका साकारणारी कलाकार नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. ही कलाकार आहे “शाश्वती पिंपळीकर”. काही दिवसांपूर्वीच शाश्वतीने लग्नाआधी बॅचलर पार्टी साजरी केली होती. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर काल गुरुवारी १७ डिसेंबर २०२० रोजी शाश्वतीचा विवाह राजेंद्र करमरकर सोबत मोठ्या थाटात पार पडला.

राजेंद्र करमरकर हा इंटेरिअर डिझायनर असून व्यावसायिक फोटोग्राफर देखील आहे. त्यांच्या हा विवाहसोहळा अगदी पेशवाई थाटात पार पडला असून या सोहळ्याला अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. बालक पालक चित्रपटा खेरीज शाश्वतीने सिंधू, चाहूल, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेत काम केले आहे. सिंधू मालिकेत तीने सरस्वती ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे खूप कौतुकही झाले. शाश्वती मूळची पुण्याची असून फर्ग्युसन कॉलेजमधून तीने आपले शिक्षण घेतले आहे. यापुढेही अनेक चित्रपट आणि मालिका साकारण्याची तिची इच्छा आहे आणि ती तिचा अभिनय असाच पुढे चालू ठेवेल तिने साकारलेले चित्रपट आणि मालिकेतील कामास प्रेक्षकांनी यापूर्वी देखील भरभरून प्रतिसाद दिलाय आणि पुढेही देतील अशी आशा आहे शाश्वती आणि राजेंद्र या नवदाम्पत्यास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…