Breaking News
Home / जरा हटके / फॅन्ड्री फेम अभिनेत्रीने समाजातील त्या महिलांबद्दल लिहलेली भावनिक पोस्ट होतेय व्हायरल

फॅन्ड्री फेम अभिनेत्रीने समाजातील त्या महिलांबद्दल लिहलेली भावनिक पोस्ट होतेय व्हायरल

मराठी चित्रपट अभिनेत्री राजेश्वरी खरात हिचा फॅन्ड्री हा पहिला वहिला चित्रपट चांगलाच गाजला होता. नागराज मंजुळे ह्यांच्या या चित्रपटामुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. ह्या चित्रपटामुळे तिला अनेक कामे देखील मिळाली. नुकताच तिचा “रेडलाईट एक विदारक सत्य” हि शॉर्ट फिल्म देखील रिलीज होत आहे. युट्युब वर देखील तुम्हाला ती पाहायला मिळणार असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटात राजेश्वरी खरात हि रेडलाईट एरियामधील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या पात्रात पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. नुकतीच राजेश्वरीने आपल्या सोशिअल मोडिया अकॉउंटवर एक पोस्ट केली आहे जी आता खूपच व्हायरल होताना पाहायला मिळतेय.

actress rajeshwari kharat
actress rajeshwari kharat

अभिनेत्री राजेश्वरी खरात लिहते ” तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या. स्त्री ने असे काम करने योग्य नवे परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो. गल्लीकडे येतांना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळसाठी च खेळण घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईल च्या रिचार्ज पेक्षा कमी किम्मत देता. सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिम्मत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात. समाजात आणखी बर्‍याच काही गोष्टी वेश्ये बद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्तं ऐकुन मजा घेतात. कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत.”

marathi film actress
marathi film actress

राजेश्वरीने अश्या चित्रपटात काम करून एक धाडसी निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. अश्या चित्रपटात काम करण्याचं सहसा कोणी करताना दिसत नाही हा खूपच किचकट विषय असल्याने असा चित्रपटात टाळणेच अभिनेत्री पसंत करतात. पण अभिनेत्री राजेश्वरीने घेतलेला निर्णय तिला खूप पुढे घेऊन जाईल असे विषय हाताळताना अभिनेत्रीला वाईट नजरांना सामोरे जावे लागते. पण तो एक अभिनय आहे आणि समाजातील प्रत्येक स्त्रीला आपल्या अभिनयातून योग्य न्याय दिला जावा घरातील माता भगिनींसारखे जगण्यासाठी ह्या साठी तिने केलेली धडपड मराठी प्रेक्षक तिला नक्कीच साथ देताना दिसेल ह्यात शंका नाही. अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला आगामी चित्रपटासाठी आणि तिने हा चित्रपट करण्यासाठी जे धाडस दाखवलं त्यात यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *