प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव ठाकरे च्या ब्रेकपच्या चर्चा

March 7, 2021
प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव ठाकरे च्या ब्रेकपच्या चर्चा

कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉस सिजन २ मध्ये वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांनी पार्टीसिपेट केले होते. बिग बॉसच्या घरात असतानाच या दोघांमध्ये प्रेमाचे सुरू जुळून आले होते. शिव ठाकरे या शोचा विजेता ठरला होता त्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी वीणा जगताप शिवच्या गावी देखील पोहोचलेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर बहुतेक वेळा हे कपल एकत्रित पाहायला मिळाले. मधल्या काळात दोघांनी एकमेकांचे बिर्थडे सेलिब्रेशन देखील अगदी दणक्यात केले होते. मात्र आता काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याची अर्थात ब्रेकअप झाल्याची चर्चा जोर धरत आहे.

veena jagtap pic
veena jagtap pic

वीणा जगताप सध्या आई माझी काळूबाई मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून ती आर्याच्या प्रमुख भूमिकेत झळकत असल्याने शूटिंगसाठी ती सतत साताऱ्यातच असते. परंतु मागील काही दिवसांपासून शिव आणि वीणा एकत्रित दिसत नसल्याने त्यांच्यात ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. शिव ठाकरे ने काही दिवसांपूर्वीच स्वतःचा ब्रँड असलेले B.REAL डिओड्रंट लॉंच केले. या सोहळ्यावेळी वीणा गैरहजर असलेली पाहायला मिळाली. तर ४ मार्च रोजी वीणाचा वाढदिवस असतो या दिवशीही वीणाने आपल्या घरच्या व्यक्ती आणि मित्रांसोबतच हा वाढदिवस साजरा केलेला पाहायला मिळाला. शिव ठाकरे शिवाय विणाचा हा वाढदिवस बरेच काही सांगून जात असल्याने सध्या तो सेलिब्रिटी विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी तुझ्यात जीव रंगला मालिका अभिनेत्री अक्षया देवधर आणि सुयश टिळक यांच्यातील ब्रेकपच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यानंतर सुयश टिळकने आपल्या इंस्टाग्रामवरून प्रेमाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याने लिहिलेली ती भलीमोठी पोस्ट त्याने डिलीट केली असली तरी त्यातून तो बरेच काही सांगून गेला होता.