झी मराठी वाहिनीवरील “पाहिले न मी तुला” ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही मालिका अनिकेत, मानसी आणि समर या तीन पात्रांभोवती गुरफटलेली पाहायला मिळत आहे. त्यात समर मानसीच्या लग्नासाठी मनोहरचे स्थळ घेऊन येतो. मालिकेत मनोहरचे लग्न अगोदरच झाले असूनही समर मानसिसोबत स्वतःच्या लग्नाचा डाव कसा आखतो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरत आहे. आज मनोहरचे पात्र साकारणाऱ्या कलाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

मालिकेत मनोहर वरघोडे हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “अमित फाटक”. अमित फाटक याचे शालेय आणि कॉलेजचे शिक्षण मुंबईतच झाले आहे. झी मराठी वरील खुलता कळी खुलेना या लोकप्रिय मालिकेतून अमितने भूमिका साकारली होती. त्यामुळे झी मराठीवरील प्रेक्षकांसाठी त्याचा चेहरा अगोदरच ओळखीचा झाला असावा. मराठी मालिकांप्रमाणे अमित हिंदी मालिकांमधूनही झळकला आहे. क्राईम पेट्रोल, मिसेस तेंडुलकर आणि झी वाहिनीवरील ये वादा रहा या त्याने अभिनित केलेल्या काही हिंदी मालिका आहेत. महेश कोठारे यांच्या झी युवा वरील “प्रेम पॉईजन पंगा” या मालिकेत त्याला अगोदर अभिनयाची संधी मिळाली होती. त्यामुळे महेश कोठारे यांनी अमितला पाहिले न मी तुला मालिकेतून पुन्हा एकदा ही संधी दिलेली दिसते. मनोहरच्या हटके भूमिकेमुळे अमित प्रेक्षकांच्या आता चांगलाच परिचयाचा बनला आहे. त्याची घाबरून बोलण्याची स्टाईल प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मनोहरचे लग्न झाले असूनही तो केवळ समरच्या आग्रहामुळे मानसीशी लग्न करण्याचा घाट घालत आहे मात्र त्याचे हे कटकारस्थान आता कसे उघडले जाईल हे लवकरच मालिकेतून पाहायला मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे शूटिंग थांबले होते मात्र मालिकेच्या मनोरंजनात व्यत्यय येऊ नये यासाठी ही मालिका गोव्यात चित्रीकरण केली जाणार आहे. नुकतेच या मालिकेतील सर्व कलाकार गोव्यात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत स्वतः शशांक केतकरने एक पोस्ट केली होती त्यामुळे मालिकेतील सेटमध्येही बदल घडून येणार आहेत. लवकरच या गोव्यातील या नव्या सेट बाबत अधिक माहिती समजेल तुर्तास मनोहरचे पात्र साकारणाऱ्या अमीत फाटक या कलाकाराला या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…