Breaking News
Home / जरा हटके / पहिल्यांदाच समोर आला अंकुर वाढवेच्या लेकीचा फोटो…जन्मल्यानंतर दिसऱ्यांदाच भेट झाल्याने ओळख

पहिल्यांदाच समोर आला अंकुर वाढवेच्या लेकीचा फोटो…जन्मल्यानंतर दिसऱ्यांदाच भेट झाल्याने ओळख

वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १४ जानेवारी २०२१ रोजी चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. “कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो” असे कॅप्शन देऊन त्याने ही आनंदाची बातमी १५ जानेवारी रोजी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. या बातमीने चाहत्यांकडून अंकुरवर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. अंकुरने यावेळी आपली पत्नी निकिता आणि लेकीचा फोटो देखील शेअर केला होता. यानंतर साधारण तीन महिन्यांनी आता अंकुर आपल्या लेकीला भेटायला त्याच्या गावी गेला आहे.

ankush wadhave actor
ankush wadhave actor

ही त्याची आपल्या लेकिसोबतची दुसरी भेट आहे असे तो म्हणतो. यावेळी अंकुरने त्याच्या या लाडक्या लेकीचं नाव “ख्याती” ठेवलं असल्याचं देखील सांगितलं आहे त्याच्या या लेकीसोबतच्या दुसऱ्या वेळच्या भेटीच्या गमतीजमती सांगताना तो म्हणतो की, “ख्यातीचा जन्म झाला तेव्हा पासून दुसऱ्यांदा भेटलो फक्त…. त्यामुळे ती पाहिले तर खूप चिडली- रडली ओळखत नव्हती पण सेल्फी कॅमेरा ओपन केला आणि तिला ओळख पटली कदाचित कारण आम्ही फक्त विडिओ कॉल वरच बोलत होतो… पण यावेळी किमान १५ दिवस तिच्यासोबत घालवायला मिळतील”… या गमतीजमती सोबतच अंकुरने आपल्या लेकीचे गोड फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ख्याती खरंच खूप क्युट दिसत आहे. चला हवा येऊ द्या’ या शोमुळं अंकुर वाढावे प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला. तो एक चांगला अभिनेता तर आहेच हे चला हवा येऊ द्या च्या मांचावरून आपल्याला पाहायला मिळालेच परंतू तो एक चांगला कवी देखील आहे हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. अंकुरनं सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम केलं होत. त्या संधीचं अंकुरनं सोनं केलं. पुढं त्याने गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘जलसा’ या मराठी चित्रपटातही त्यानं काम केलं होतं. यानंतर त्याला ‘चला हवा येऊ द्या’मध्येही काम करण्याची त्याला नामी संधी मिळाली आणि या संधीमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहोचला.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *